अजित मांडके, ठाणेघरातला एसी सुरु केला तर किती युनिट वीज वापरली गेली आणि कपड्यांना इस्त्री करताना किती युनिट वीज लागली हे घरबसल्या पाहण्याची सुविधा असलेले स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यामुळे मी घरात नव्हतो तरी मला एवढे भरमसाठ बिल कसे आले, अशा तक्रारी करायला वीज ग्राहकांना संधी राहणार नाही. शिवाय आपण वीज बचत करुन किती पैसे वाचवले याचा नेमका अंदाज ग्राहकांना बांधता येणार असून पहिल्या टप्प्यात ९१ हजार मीटर बसविण्यात येणार आहेत.ठाणेकरांना स्मार्ट करण्यासाठी महावितरणने ही स्मार्ट मीटरची संकल्पना पुढे आणली आहे. ज्यामध्ये ग्राहकाला ही माहिती तत्काळ मीटरवरच पाहता येणार आहे. यासाठी महावितरणने ४०० कोटींचा पहिल्या टप्यासाठी स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये, स्मार्ट मीटर, नवीन विद्युत रोहित्र बसविणे, वीज वाहिन्या बदलणे, भूमिगत वाहिन्या टाकण्यावर भर, विद्युत रोहित्राची क्षमता वाढविणे आदी कामे केली जाणार आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये ठाणे शहराची निवड झाल्यानंतर महापालिकेने स्मार्ट सिटीचा ५५५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. स्मार्ट शहरातील वीज ग्राहकही स्मार्ट असला पाहिजे, त्याला विजेचा वापर आणि वीज बचत करता आली पाहिजे, हा यामागील हेतू आहे. कशासाठी स्मार्ट मीटर...१घरातील विद्युत उपकरणांच्या वापराचे प्रमाण वाढल्यामुळे विद्युत देयकांच्या रकमेत वाढ होते. मात्र अचानकपणे बिलाच्या वाढलेल्या रकमेमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यातून महावितरणचे अधिकारी व ग्राहक यांच्यात वाद होतात. मीटरमध्येच त्रुटी असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येतात. २या पार्श्वभूमीवर बसविण्यात येणारी स्मार्ट मीटर जीआयएस (जिओग्रॅफिक इन्फर्मेशन सिस्टीम) प्रणालीच्या धर्तीवर असणार आहेत. त्यामुळे महावितरणचे अधिकारी तसेच ग्राहकांना इंटरनेटच्या आधारे घरातील वीज वापर पाहता येऊ शकतो.
ठाण्यात महावितरणचे स्मार्ट मीटर, ४०० कोटींचा आराखडा
By admin | Published: December 12, 2015 1:39 AM