ठाणे: राज्यात बंदी असलेल्या गुटख्यासह सुगंधित तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाºया आरीफ जफर शेख (२२, रा. बापूजीनगर, राबोडी, ठाणे) याला राबोडी पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करुन अटक केली. त्याच्याकडून गुटख्यासह ८२ हजार ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राबाेडी पाेलिसांनी शनिवारी दिली.
राबोडी भागात आरीफ हा गुटख्याची तस्करी करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक विकास सूर्यवंशी, योगेश काकड, योगेश धांगडे, पोलिस हवालदार उमेश जाधव आणि राबोडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक गणेश बडगुजर आदींच्या पथकाने राबोडीतील बापुजीनगर येथील अन्सारी हाउसच्या बाजुला असलेल्या एका खोलीत छापा टाकला. या छाप्यात आरीफ याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुंगधी तंबाखु असा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीरित्याजवळ बाळगल्याचे आढळले.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द एनडीपीएस कायद्यांतर्गत तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला ११ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठउीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आरीफने हा गुटखा कुठून आणला? त्याची ताे काेणाला विक्री करणार हाेता? त्याचे यात आणखी िकती साथीदार आहेत? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने दिली.