शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम हॅक करून ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:42 AM

‘स्नॅपचॅट’ ‘हॅक’ करून ‘इन्स्टाग्राम’चे बनावट अकाउंट बनवून नौपाड्यातील एका अठरावर्षीय तरुणीला सतत मानसिक त्रास देणा-या दर्श शांतिलाल सत्रा (२१) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे

ठाणे : ‘स्नॅपचॅट’ ‘हॅक’ करून ‘इन्स्टाग्राम’चे बनावट अकाउंट बनवून नौपाड्यातील एका अठरावर्षीय तरुणीला सतत मानसिक त्रास देणा-या दर्श शांतिलाल सत्रा (२१) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गेले सहासात महिने चिवटपणे या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अखेर जेरबंद केले. त्याचा लॅपटॉप आणि दोन मोबाइलही पोलिसांनी जप्त केले आहेत.नौपाड्यात राहणारी ही तरुणी विलेपार्ले येथील गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटमध्ये मास मीडियाचे शिक्षण घेत आहे. तिथेच तिच्या ‘स्नॅपचॅट’वर सुरुवातीला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून त्याने तिच्याशी मैत्री केली. ‘तुला मुले आवडतात, तू मुलांचे आयुष्य खराब का करतेस?’ असे म्हणून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तब्बल सहा महिने त्रास दिल्यानंतर त्याने तिचे ‘स्नॅपचॅट’चे अकाउंटही हॅक केले. या त्रासाला कंटाळून तिने अखेर ‘स्नॅपचॅट’ही बंद केले. पुढे त्याने तिच्या ‘इन्स्टाग्राम’वर जानेवारी २०१७ मध्ये फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्याच्या ‘इन्स्टाग्राम’च्या अकाउंटवर तिचे आणि तिच्या मित्राचे फोटो ठेवून तिच्या मित्रमैत्रिणींनाही त्याने मेसेज पाठवले. नंतर, अनेक मुलांची नावे पाठवून ‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ येत आहे, काळजी घे,’ असा मेसेज पाठवून तिला त्रास देणे सुरू केले. त्यानंतर, तिने ‘इन्स्टाग्राम’ही बंद केले. पुढे त्याने तिचे वडील आणि भावालाही मेसेज करून तिच्यासह तिच्या कुटुंबालाही मानसिक त्रास दिला. शिवाय, तिचे ‘इन्स्टाग्राम’ अकाउंट हॅक करून त्याद्वारे तिचे फोटो इतरांना पाठवून तिची फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध १ जून २०१७ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चिवटपणे तपास करून दर्श याला मंगळवारी अटक केली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया