ठाणे : मोबाइल जुना झाला होता. त्याची वारंटी, गॅरंटी संपली होती, रॅम कमी असल्या कारणाने ते सतत हँग होत असत. दुरुस्तीचे बिल सेविकांना स्वत: भरावे लागत असे.
.........
*कामांचा व्याप वाढला -
पोषण माह अभियान कार्यक्रमामुळे अंगणवाडी सेविकांना स्वत:च्या मोबाइलवर काम करण्यासाठी तगादा लावला जात आहे. दर महिन्याला मासिक अहवाल सादर करावा लागतो. गरोदर, स्तनदा मातांची संख्या ऑनलाइन नोंद करावीच लागत आहे. सहा महिने ते तीन वर्षे मुलांची वजन उंची घ्यावी लागत आहे. ३ ते ६ वयोगटांतील मुलांची संख्या अंगणवाडी केंद्रात नोंद करावी लागत आहे. गरोदर, स्तनदा माता सहा महिने ते सहा वर्षे वयोगटांतील मुलांना आहार वाटप करावा लागत आहे, लसीकरण माहिती ठेवावी लागत आहे. गृहभेटी देऊन ऑफलाइन नोंद ठेवण्याचे कामही वाढले.
......
सेविकेची प्रतिक्रिया -
अनेक प्रकारचे अहवाल लिहावे लागत आहेत. याशिवाय अनेक प्रकारचे कार्यक्रम करावा लागत आहेत. त्यासाठी वेळही पुरत नाही. अहवाल नाही दिले तर वरिष्ठांकडून विचारणा होते. तुम्ही अहवाल का वेळेवर दिले नाही, त्यामुळे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी आमची अंगणवाडीसेविकांची गत झाली आहे.
- शारदा ठाकरे, भिवंडी.
...........
अधिकारी प्रतिक्रिया -
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांच्या अहवालावर केवळ पाच टक्के परिणाम झाला आहे. अवघ्या पाच टक्के सेविकांनी मोबाइल जमा केले असावेत पण आता तेही परत घेत आहेत. त्यांच्याकडून अहवाल देण्याचे काम सध्या सुरू आहेत. त्यामुळे फारसा परिणाम झाला नाही.
- एस. बागुल
उपमुख्य कार्यकारी अधिकारी - महिला व बालकल्याण, जि. प. ठाणे
--