लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ठाणे पोलीस आयुक्तालयातील कल्याण परिमंडळातील २३३ पोलीस कर्मचारी आणि २० अधिकारी अशा एकूण २५३ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५ पोलिसांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या सोमवारपर्यंत ३९ हजार १७२ वर पोहोचली आहे. तर, यातील ७७३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते मे या कालावधीत लागू केलेला लॉकडाऊन यशस्वी करण्यात कल्याण परिमंडळमधील पोलिसांची सर्वांत महत्त्वाची भूमिका होती.
तपास नाके, रुग्णालये, क्वारंटाइन सेंटर आणि कंटेनमेंट झोन अशा प्रत्येक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून पोलीस आपली जबाबदारी पार पाडतानादिसले.पोलिसांना जबाबदारी पार पाडताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता येत नाही. वेळोवेळी लोकांची मदत करावी लागते, त्यासाठी संपर्कातच राहावे लागते. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस कोरोनाबाधित होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.च्लॉकडाऊनमध्ये दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून जबाबदारी पार पाडणारे पोलीस आता अनलॉकमध्येही नियम न पाळणाऱ्यांवर करडी नजर ठेवून आहेत.च्कल्याण परिमंडळ ३ चा आढावा घेता आतापर्यंत २५३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.च्डिस्चार्ज झालेल्या पोलिासांमध्ये १६८ पोलीस कर्मचारी तर १३ अधिकारी आहेत. यातील १२६ पोलीस कर्मचारी आणि आठ पोलीस अधिकारी उपचारानंतर पुन्हा सेवेत हजर झाले आहेत.च्सध्या २५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाशी लढताना मृत्युमुखी पडलेले पाच पोलीस हे रामनगर, विष्णूनगर, मानपाडा, डोंबिवली अतिक्रमण आणि कल्याण नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचारी होते.