---------------------
- भात या प्रमुख पिकासह जिल्ह्यात नागली, वरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. याशिवाय उडीद, मूग, चवळी, तूर आदी कडधान्याची जोमाने वाढ होत आहे. नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी वाडा, कोलम, कर्जत आदी दर्जेदार भाताची लागवड हाती घेतली. यंदा काही शेतकऱ्यांनी काळ्या भाताची लागवड प्रथमच केली आहे. त्यास बाजारभाव चांगला मिळत असल्याचे ऐकायला मिळाले.
-----------------------
- शेतकऱ्यांनी यंदा १३ हजार ३६० मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. यात युरिया १० हजार ३९७ मे. टन, डीएपी खत ३०० मे. टन, सुफला, दोन हजार १७५ मे. टन आणि इतर खते ५३५ मे. टन खताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात खताचा दोन हजार १८ मे. टन साठा आधीच उपलब्ध ठेवला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मंजूर आवटनाप्रमाणे खत कृषी सेवा केंद्रांवर पोहोच झाले होते. महाराष्ट्र कृषी औद्योगिक महामंडळाकडून जिल्ह्यात १५ ठिकाणी ६७० मे. टन युरिया खताचा संरक्षित साठ्याचे नियोजन केले आहे.
-----------------
जिल्ह्यात सध्या तरी चांगला पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पेरण्या चांगल्या होऊन भात रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांनी भातलागवड करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून पाऊस पडला नाही. पण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे.
- अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे
----------
जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आतापर्यंत पडलेला सरासरी पाऊस मिमी.मध्ये
१) ठाणे- ६६७ मिमी.
२) कल्याण- ६३१ मिमी.
३) मुरबाड- ५९७.५ मिमी.
४) भिवंडी- ३९९ मिमी.
५) शहापूर- ५७४.९ मिमी.
६) उल्हासनगर- ५२२.५ मिमी.
७) अंबरनाथ- ५०२.३ मिमी.
-------------