- सुरेश लोखंडेठाणे : केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे.हयातीची माहिती आवश्यक हयात असल्यासह विविध स्वरूपाची माहिती जिल्ह्यातील या पेन्शन लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसीच्या स्वरूपात नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत शेवटची मुदत होती. त्यात आणखी मुदतवाढ देण्यात आली हाेती. आतापर्यंत जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याच्या वृत्तास जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत या शेतकऱ्यांचे पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. या योजनेचे जिल्ह्यात सव्वालाख लाभार्थी आहेत. त्यातील बहुतांशी शेतकरी ‘कर’ भरणारे धनवान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या पेन्शनची रक्कम वसूल करण्याची कारवाई याआधीच सुरू केली आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे. त्वरित ई-केवायसी कराकेंद्र शासनाच्या या सहा हजारांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हयात असल्यासह अन्य माहिती यंदा शेतकऱ्यांनी नोंद करण्याची अट घातली होती. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या माहितीचे केवायसी संबंधित कृषी विभागाकडे, यंत्रणेकडे नोंद करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना या पेन्शनच्या लाभापासून कायमचे वंचित राहावे लागणार असल्याचे कुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
...तर ५४ हजार शेतकऱ्यांची पेन्शन बंद?, केवायसीची अंतिम मुदत बुधवारपर्यंत
By सुरेश लोखंडे | Published: August 29, 2022 9:08 AM