शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
2
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
3
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
4
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
5
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
6
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
7
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
8
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
9
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
10
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
11
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
12
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान
13
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
14
पुढचा गिल, जैस्वाल, बुमराह तुमच्यापैकीच; रोहित शर्माचा कर्जत जामखेडमध्ये मराठीतून संवाद
15
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
16
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
17
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
18
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
19
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

... तर नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात -आनंद नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 12:20 AM

Relationships : महाविद्यालय परिसरात मार्गदर्शनाचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आदिम, उत्पादक आणि पुरोगामी भावना आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याच्या वर्तनाशी असलेल्या नात्यांबद्दलही सांगितले.

ठाणे  - महाविद्यालय परिसरात मार्गदर्शनाचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आदिम, उत्पादक आणि पुरोगामी भावना आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याच्या वर्तनाशी असलेल्या नात्यांबद्दलही सांगितले. जमाखर्चाचा हिशोब संपला की नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात तसेच, शिक्षक- मार्गदर्शक व विद्यार्थी यांच्यामधले नाते हे कधीही संपत नाही असे ते म्हणाले.जोशी- बेडेकर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, तत्त्वज्ञान विभाग आणि समुपदेशन कक्ष यांनी मंगळवारी विविध वर्गांचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक मेंटर्ससाठी मेंटर्सशिपवर एका ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. आधारातून गुणवत्तेकडे असे या कार्यशाळेचे नाव होते. नाडकर्णी व एसएनडीटी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि समुपदेशक डॉ. अनुराधा सोवनी हे या कार्यशाळेतील मुख्य वक्ते होते.सकारात्मक बदल घडविण्यासाठी मेंटर्सनी कार्यरत राहणे यावर नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सकारात्मक बदल घडवून आणण्याबाबत आपले विचार व्यक्त करताना त्यांनी गुरू- शिष्यांमधले नाते हे कधीच संपत नाही, असेही शेवटी सांगितले. प्राचार्या व तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. सुचित्रा नाईक यांनीही विचार व्यक्त केले. कार्यशाळेत सुमारे ९८ शिक्षक व मार्गदर्शक सहभागी झाले होते. अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाच्या समन्वयक डॉ. रश्मी अग्निहोत्री यांनी प्रारंभी महाविद्यालयातील सध्याची मेंटरिंग प्रणाली व त्याचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेचा समारोप पसायदानाने करण्यात आला. अनुराधा सोवनी यांचे मार्गदर्शन मेंटरिंग ही औपचारिक आणि मोजमाप करता येईल अशी प्रणाली म्हणून विकसित करणे यावर डॉ. अनुराधा सोवनी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनाची प्रणाली बळकट करण्यासाठी तसेच त्याची औपचारिक नोंद करण्यासाठी संस्थेच्या विविध भागधारकांबरोबर जसे की विद्यार्थी, माजी विद्यार्थी इत्यादी. सहयोगात्मक उपक्रम आयोजित करण्यावर भर दिला. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपthaneठाणे