कल्याण : वर्दळीने अहोरात्र गजबजलेल्या कल्याण शहराच्या पश्चिम भागातील एका रस्त्यालगत थंडीत कुडकुडत पहुडलेली आजीबाई. निराधार. निराश्रीत. आपापल्या व्यापात धावपळ करणाºया कुणाचे तिच्याकडे लक्ष नाही. त्यावेळी तेथून जाणाºया आणि आजीबाईला कायमची काही मदत करता येईल का, या विचाराने थबकलेल्या एका तरूणाने सोशल मीडियावर तिची क्लिप टाकली. त्यातून अवघ्या पाच दिवसांत पुण्याच्या संस्थेने आजीबार्इंना निवारा मिळवून दिला. त्यातून आजीबाईच्या चेहºयावर आनंद दाटून आला आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, याचा अनुभवही सर्वांना मिळाला.बिर्ला कॉलेज रोड परिसरातील कोकण वसाहतीत राहणारा निलेश जगदाळे (२८) हा व्यवसायाने सिव्हिल कंत्राटदार असलेला तरूण. बाईकवरुन जाताना त्याला रस्त्याच्या शेजारी आजी पहुडलेली दिली. तिच्या अंगावर कशीबशी एक चादर होती. तिला थंडीचा जोर सहन होत नसल्याने ती कुडकुडत होती. निलेशने आपल्या हातातील मोबाईलवर तिचे चित्रिकरण केले आणि सोशल मीडियावर १ नोव्हेंबरला हा व्हिडीओ टाकून मदतीची हाक दिली. अनेकांनी तो व्हिडीओ पाहिला. निराधारांना निवारा देणाºया पुण्यातील योगेश मालकरे यांच्या स्माईल या सामाजिक संस्थेने पाचव्या दिवशी त्याच्याशी संवाद साधला. ५ नोव्हेंबरच्या रात्री त्यांची गाडी आली. त्यांनी आजीबार्इंना नेण्याचा मानस व्यक्त केला. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली.निलेशला या कामात त्याचे मित्र उद्योजक गणेश शेलार, प्रशांत मेस्त्री, वसंत खापरे, महेश केणे, आकाश अहिर, स्वप्नील कांबळे, दिनेश गावडे, दर्शन मार्कंडे, विशाल सुकाळे, योगेश राऊत, जयेश चिकणे, राहुल गायकवाड आणि बाबू शिंदे यांची साथ मिळाली. या सगळ््यांनी रविवारी रात्री उशिरा आजी नीलाबाई यांना निरोप दिला.सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनीही सामाजिक भान जपल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अशा सकारात्मक कामासाठी सोशल मीडियाचा उपयोग केल्यास बेघरांनाही निरावा मिळू शकतो. गरजूंना मदत मिळू शकते. नातलगांचा शोध लागू शकतो. सामाजिक संस्थांपर्यंत माहिती पोचल्यास त्यांनाही संबंधित व्यक्तींपर्यंत मदत पोचवता येते, अशा भावना निलेशचे मित्र आणि सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
सोशल मीडियामुळे बेवारस आजीबार्इंना मिळाला निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:53 AM