ठाणे : सामाजिक बांधीलकी मानूंन कार्य करणारे अनेक आहेत. पण या कार्यासाठी तन - मन - धन वेचुन कार्य करण्याची नितांत गरज आहे . प्रत्येकाच्या सामाजिक कृतीतून समाजसेवेचा पसारा वाढला पाहिजे ," असे मत कवी अशोक बागवे यांनी ठाण्यात व्यक्त केले .
सहजीवन फाउंडेशन आणि शारदा प्रकाशन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी डॉ . शाहू रसाळ यांच्या ' प्रेमात खरोखर जग जगते ," आणि महात्मा गांधी आणि इतर दिवगंताच्या नावे " या दोन काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते . यावेळी व्यासपीठावर नानजी खिमजी ठक्कर , कवयित्री मेघना साने ,डॉ . शाहु रसाळ , कविता राजपूत , राजेन्द्र गायकवाड़ ई . मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कवी बागवे म्हणाले ", डॉ . शाहू रसाळ यांनी नेत्रतन्य डॉ . तात्याराव लहाने यांच्या पावलावर पाऊल ठेवलेले आहे. हजारो दृष्टिहिनाना दृष्टि मिळवुन दिलेली आहे . वाढ़दिवसानिमित्त डॉ . शाहू रसाळ दरवर्षी मोफत ऑपरेशन करीत आहेत . गरजवंताला मदतीचा हात देणारे डॉ. रसाळ यांनी आपल्या कृतीतून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. डॉ . शाहू रसाळ यांनी केवळ सामाजिक आशयाच्या कविता लिहिल्या नाहीत तर सामाजिक कार्याचा मंत्र आपल्या कृतीतून अंगीकारलेला आहे . यावेळी बोलताना डॉ . शाहू रसाळ म्हणाले ", माझे बालपण अत्यंत खड़तर गेले . मामानी माझे शिक्षण पूर्ण केले . त्यामुळे वंचितांचे अश्रू मला माझेच वाटतात. प्रत्येकाने आपापल्या परिने सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवावा. "ठाण्यातील हार्ट पेशंटसाठी अद्ययावत रुग्णालय उभारन्याचे काम जोरात सुरू असल्याचे सांगून नानजीभाई खिमजी ठक्कर म्हणाले " , ठाण्यातील नागरिकाना आजारपण्याच्या कोणत्याही उपचारसाठी मुलुंडची वेश ओलांडायची गरज नाही . अत्याधुनिक उपचार देणारे रुग्णालय ठाण्यात उभारले जाणार असून या रुग्णालयात हृदयरोग मोफत बरा केला जाणार आहे . डॉ. शाहू रसाळ यांच्यासारख्या सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या सेवाभावी माणसांमुळे हे स्वप्न पुर्णत्वला जाणार आहे . " खासदार राजन विचारे यांनीही डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . नानजी खिमजी ठक्कर यांना रूग्णमित्र पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . जुई प्रधान हिने काव्यसंग्रहातील काही निवडक कविता सादर करून उपस्तिथांची दाद मिळवली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले .' सहजीवन संगीत संध्या ' या वाद्यवृंदातील अनेक गायक - गायिकानी विविध गाणी सादर करून कार्यक्रमाची सुरूवात केली . डॉ. शाहु रसाळ आणि प्रीती निमकर यांनी अनेक द्वंद्वगीते सादर केली. सीकेपी हॉलमधे तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमासाठी अनेक रसिक ठाणेकर उपस्थित होते.