अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड हे सातत्याने पेटत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डम्पिंगवर मातीचा भराव करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कचऱ्यामधून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे. डम्पिंगवरील उपाययोजनेसाठी पालिकेने ४५ लाखांची तरतूदही केली आहे.अंबरनाथ नगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड फॉरेस्ट नाक्यावर असून या ठिकाणी टाकण्यात येणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने या ठिकाणी कचºयाला आग लावण्याचे प्रकार वाढले होते. डम्पिंगला सतत आग लागत असल्याने त्याच्या धुराचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. अनेक सोसायटी या धुरामुळे त्रस्त आहेत. गेली अनेक वर्ष दुर्गंधीचा त्रास सहन केल्यावर मागील दोन वर्षांपासून नागरिकांना धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा निघत नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या विरोधात आंदोलनही केले होेते. मात्र ही समस्या सातत्याने वाढत असल्याने या डम्पिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने डम्पिंगच्या कचºयावर मातीचा भराव करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कचºयातून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे. डम्पिंगवर मातीचा भराव करण्यासाठी ३० लाखांची तर पाईप टाकण्यासाठी १५ लाखांची असे एकूण ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. युध्दपातळीवर हे काम सुरू झाले असून काही प्रमाणात त्रास देखील कमी झाला आहे.मागील १५ दिवसांपासून पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर मातीचा भराव करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी अजूनही मातीचा भराव झालेला नाही त्या ठिकाणी आगीचे सत्र सुरू आहे. मात्र आगीचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना होणारा त्रास पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र रस्त्याच्याजवळ असलेला कचरा अजूनही पेटत असल्याने त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे डम्पिंग ग्राऊंडवर येणारा कचरा कसा कमी होईल यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहे.उपाययोजना सुरूओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मुख्याधिकारी देविदास पवार यांनी मंगळवारी पुन्हा डम्पिंगची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतल्यावर प्रभागातील कचरा वर्गीकरण प्रकल्पांना भेट दिली. घंटागाडी चालकांनाही कचरा संकलित करताना योग्य प्रकारे कचरा हाताळण्याचा सल्ला दिला. पालिकेच्यावतीने प्रभागानुसार कचरा संकलनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचा परिणाम येत्या काही दिवसात दिसेल अशी प्रतिक्रीया मुख्याधिकारी पवार यांनी दिली.
डम्पिंग ग्राउंडवर मातीचा भराव; ४५ लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:49 PM