शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तक्रारींचे निराकरण आता मोबाइलद्वारे

By admin | Published: February 17, 2017 2:04 AM

महावितरणसंदर्भात असलेल्या अनेक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी महावितरणने मोबाइल आणि ई-मेल माध्यम निवडले

ठाणे : महावितरणसंदर्भात असलेल्या अनेक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी महावितरणने मोबाइल आणि ई-मेल माध्यम निवडले आहे. महावितरणने सुरू केलेल्या मोबाइल एसएमएस सेवेला भांडुप परिमंडळामधून चांगला प्रतिसाद मिळाला असून या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी संपूर्ण भांडुप परिमंडळामधून तब्बल ११ लाख ७० हजार ग्राहकांनी आपल्या मोबाइल नंबरची नोंदणी महावितरणकडे केली आहे. यामध्ये ठाणे सर्कलमध्ये ५ लाख ८७ हजार, तर वाशी सर्कलमध्ये तेवढ्याच ग्राहकांनी नोंदणी केली आहे. महावितरणने एसएमएसवर वीजबिल व वीजपुरवठ्यासंदर्भात माहिती देण्याची सुविधा सुरू केली आहे. सहा महिन्यांपूर्वी या सुविधेला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी आता बहुसंख्य ग्राहकांनी तिचा लाभ घेण्यास सुरु वात केली आहे. यासाठी ग्राहक केंद्रासोबतच अ‍ॅप, संकेतस्थळ व ‘एसएमएस’द्वारे मोबाइल नंबरनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांचा मोबाइल क्र मांक जर महावितरणकडे नोंद असेल, तर ग्राहकांना त्यांचे वीजबिल एसएमएसद्वारे मिळू शकणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस काही अडचणींमुळे वीजबिल मिळाले नाही किंवा मिळालेले वीजबिल हरवले, तर या एसएमएसचा फायदा ग्राहकांना होणार आहे. तसेच बिल भरण्याची अंतिम तारीख संपत आली असल्यास त्याचीही सूचना एसएमएसद्वारे मिळणार आहे. काही वेळा देखभाल दुरु स्तीसाठी जर महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात येणार असेल, तर त्याची पूर्वसूचना ग्राहकांना देण्याची सुविधा या एसएमएस सुविधेमध्ये असल्याने याचा चांगलाच फायदा आता वीजग्राहकांना झाला आहे. महावितरणच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी या सुविधेला सुरु वात केली होती. या सहा महिन्यांत ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. भांडुप परिमंडळामध्ये १७ लाख ३३ हजार ग्राहक असून यापैकी तब्बल ६७.५० टक्के ग्राहकांनी आपल्या मोबाइलची नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)