ठाणे : यंदा मुंबई महानगरपालिकेने विशेष व्यवस्था केल्यामुळे समुद्राला उधान भरती आली तरी पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही असे सांगितले आहे. तरीही पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस व वेळा आपणास माहित असतील आणि त्याचवेळी जर प्रचंड पाऊस झाला तर काळजी घेता येईल म्हणून खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी समुद्राला साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस जाहीर केले आहेत.
(१) दि. ४ जून रविवार दुपारी १२-१६ (२) दि. ५ जून सोमवार दुपारी १-०१ (३) दि. ६ जून मंगळवार दुपारी १-४७(४) दि. ७ जून बुधवार दुपारी २-३५ (५) दि. ८ जून गुरुवार दुपारी ३-२५ (६) दि. ३ जुलै सोमवार दुपारी १२-०२(७) दि. ४ जुलै मंगळवार दुपारी १२-४९ (८) दि. ५ जुलै बुधवार दुपारी १-३६ (९) दि. ६ जुलै गुरुवार दुपारी २-२३(१०)दि.७ जुलै शुक्रवार दुपारी ३-१० (११)दि.८जुलै शनिवार दुपारी ३-५५ (१२)दि. १ॲागस्ट मंगळवार सकाळी११-४६ (१३) दि. २ ॲागस्ट बुधवार दुपारी २२-३० (१४) दि. ३ ॲागस्ट गुरुवार दुपारी १-१४ (१५) दि. ४ ॲागस्ट शुक्रवार दुपारी १-५६ (१६) दि. ५ ॲागस्ट शनिवार दुपारी २-३८ (१७) दि. ६ ॲागस्ट रविवार दुपारी ३-२०