भार्इंदर: मीरा-भार्इंदर भाजपातील काही प्रवृत्ती अटलजींच्या विचारधारेवर न चालता व्यक्तिगत स्वार्थ व नफेखोर कंपनीप्रमाणे चालत आहेत. भारतीय जनता पार्टी कुणाची खाजगी मालमत्ता नाही. शहरात अटल फाउंडेशनची ताकद कानाकोपऱ्यांत उभी करू. संघटना वाढवण्याचे जो काम करेल, त्याला कोणी अडवू शकत नाही. अशा प्रकारचे सूर भाजपातील ज्येष्ठांनी स्थापन केलेल्या अटल फाउंडेशनच्या वतीने झालेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त कार्यक्रमात उमटले. विशेष म्हणजे यावेळी भाजपाचे आजीमाजी नगरसेवक, पदाधिकाºयांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.मीरा-भार्इंदर शहरांतील भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मिळून अटल फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. अटलजींचे विचार, नैतिक मूल्ये व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासह त्याचा प्रचार करण्याकरिता, सामाजिक कार्यासाठी फाउंडेशनची स्थापना केल्याचे सांगितले जाते.फाउंडेशनचे धनराज अग्रवाल, श्याम मदने, ओमप्रकाश गाडोदिया, डॉ. सुरेश येवले, राजेंद्र मित्तल, गजानन नागे आदी उपस्थित होते. यावेळी अटलजींना आदरांजली वाहण्यात आली. भाजपाचे विभागीय अध्यक्ष अनिल भोसले, नगरसेविका मीरादेवी यादव, नगरसेवक सचिन म्हात्रे, मोहन म्हात्रे, केसरीनाथ म्हात्रे उपस्थित होते.पक्ष कुणाचा व्यक्तिगत नाही. आज कुणी या पदावर तर कुणी त्या पदावर असेल. जो संघटना वाढवण्याचे काम करेल, त्याला कुणी अडवू शकत नाही, असे भोसले म्हणाले. पालिकेत सत्ता असताना अटलजींचा मोठा कार्यक्रम व्हायला हवा होता. कानाकोपºयांत अटल फाउंडेशनची ताकद उभी करू. भाजपाची दुप्पट ताकद होईल, असे ज्येष्ठ कार्यकर्ते केसरीनाथ म्हात्रे म्हणाले. शहर व पालिकेत अटलजींच्या विचारांची गरज आहे, असे मदने म्हणाले.चोर, लफंगे पक्षाची संस्कृती नाही : पक्षाने ठेवलेल्या अटलजींच्या शोकसभेत अटलजींची नीती व विचारधारेची जाण असणारा वक्ता नव्हता, अशी आठवण गाडोदिया यांनी सांगितली. तर, अटलजींची विचारधारा, नैतिक मूल्ये व तत्त्वे बाजूला ठेवून शहरात सत्ता व संपत्तीच्या हव्यासासाठी पक्षदावणीला बांधला जात असल्याची झोड डॉ. येवले यांनी उठवली. चोर, लफंगे ही पक्षाची संस्कृती नाही. अटलजींची विचारधारा व नैतिक मूल्यांसाठी फाउंडेशन आग्रही असेल, असे येवले म्हणाले.
भाजपातील काही प्रवृत्तीचे वागणे नफेखोर कंपनीप्रमाणे, ज्येष्ठांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 3:21 AM