दिवा (ठाणे) - आज आगासन गावातील गावकरी,शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांना मध्ये बैठक पार पडली. विषय होता नवीन होणारा दिवा येथून आगासन मार्गे कल्याण शीळ- रोड.सदर रस्ता ठाणे महापालिका तयार करत असून त्यामुळें आगासन गावात 200 कुटुंबांची घरे जाणार आहेत.
यासाठी काही ग्रामस्थांनी याचा विरोध केला असून सदर रस्ता आगासन गावाबाहेरून न्यावा अशी मागणी केली. ही मागणी गावकऱ्यांनी भाजप पक्षा कडे सुद्धा केली आहे. यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव आव्हाड यांनी सर्वांना मार्गदर्शन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सदैव ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले. सदर बैठकीला भाजपचे नंदू परब , रोहिदास मुंडे, सागर शिंदे, मूर्ती मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे, श्रीवास्तव आणि ग्रामस्थ उपस्तिथ होतें.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची लवकरच बैठक घेऊन यातून पर्यायी रस्ता आगासन गावबाहेरून करावा ही मागणी करणार आहोत - शिवाजी आव्हाड , भाजपा.
आम्ही शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार. दिवा शहराचा विकास करताना कोणीही राजकारण करू नये. ज्याचे नुकसान होणार आहे त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे आणि ती मिळावी अशी मागणी सुद्धा महासभेत केली. - रमाकांत मढवी , उपमहापौर.