शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

लोकसाहित्यातील ‘सोनू’ वामनदादांचीच, नाही दुसऱ्या कोणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू साऱ्या चाळीतल्या बायका, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ’ हे गीत महाकवी वामनदादा कर्डक यांचे आहे. मध्यंतरी ते गीत व्हायरल झाले, तेव्हा ते आरजे मलिष्काच्या नावावर खपविले गेले. अस्सल लोकसाहित्यातील ‘सोनू’ ही वामनदादांचीच आहे, ती दुसऱ्या कोणाची नाही. मात्र सध्या साहित्यात जी उचलेगिरी चालली आहे, ती थांबली पाहिजे, असे खडे बोल उचलेगिरी करणाऱ्यांना ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत कवी यांनी सुनावले.

नाशिकच्या एका लहानशा गावात जन्माला आलेले वामनदादा हे साहित्यातील ‘दादा’ होते. लोकगीतांचे ते एक विद्यापीठ होते. त्यांचे शिक्षण अवघे इयत्ता तिसरीपर्यंत झाले होते, तरी त्यांच्या लेखणीची धार मोठी होती. त्यांनी लोकमनावर अधिराज्य केले. वामनदादा यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात कल्याणनगरीतून १४ ऑगस्टपासून होत आहे. लोककवी वामनदादा यांनी लिहिलेली अनेक गाणी, लोकगीते, लावण्या, भीम आणि बुद्धगीते आजही सगळ्य़ांच्या तोंडी आहेत. सोनू ही वामनदादांची आहे. मात्र उचलेगिरी करून लोककवींच्या रचना स्वत:च्या नावावर खपविल्या जात असल्याचा आरोप कवी मोरे यांनी केला आहे. शिक्षित माणसांनी तरी लबाडी बंद करावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी ‘नवनीत’चे गाईड आले होते. त्यात वामनदादांची कविता अनंत काणेकर यांच्या नावावर खपविली होती. त्यातून वामनदादांचे नाव गायब करण्यात आले होते.

वामनदादांनी चित्रपटात गाणी लिहिली. ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला’ हे गाणे खूप गाजले. पतिपत्नीतील भांडण अत्यंत समर्पकपणे त्यांनी या गीतातून अधोरेखित केले. त्याचबरोबर ‘वारा हलता झुलता वारा, सांगे सख्याला तारा, टाका पलंग परस दारा’ ही लावणी रोशन सातारकर यांनी गायली. ती अजरामर झाली आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेली ‘ह्यो ह्यो पाहुणा सखूचा मेव्हुणा माझ्याकडं बघून हसतोय गं,’ ही लावणीदेखील अत्यंत लोकप्रिय झाली.

वामनदादा हे चित्रपटाच्या व्यावसायिक धंद्यात रमले नाहीत. त्यांनी ती वाट सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला वाहून घेतले. ‘जरी संकटांची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती,’ मी वादळ वारा, पंचशिलाची ऋणीच राहील धरती सदा, मी बुद्धाची पायघडी, सांगू किती मी दादा - एकतेने येथे नांदा, चंदनाची छाया, नागनदीच्या काठी, एक जीवन विधाता, गौतम दूर रहने से गौतम न मिलेगा, त्याचबरोबर बिर्ला बाटा तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील, ही गीतसंपदा कालातीत आहे. त्याचे कारण व्यवस्था आणि समाज अद्याप बदललेला नाही. त्यामुळे ही कविता आजच्या काळातही कष्टकऱ्यांना तितकीच जवळची वाटते. कोरोना संकटकाळात ती आणखी आपलीशी वाटते. ती वेदना आणि दु:ख मांडणारी आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी ठरते. वामनदादांनी कोणत्या पुरस्काराची अपेक्षा केली नाही. पुरस्काराने माणूस सीमित होतो. ते स्वत: एक विद्यापीठ होते. त्यांच्या काव्याचा जागर शताब्दी वर्षानिमित्त होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

....................