शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

ठाणे जिल्ह्यातील ४१६ गांवांमधील महसूलच्या दप्तराची लवकरच ‘ई चावडी’ प्रणाली; अधिकार्यांना आँनलाईनचे धडे!

By सुरेश लोखंडे | Published: November 04, 2022 10:00 PM

या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

ठाणे : महसूल विभागासंबंधीच्या कामकाजात एकसूत्रपणा येऊन सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वसामान्यांसाठी ‘ई चावडी’ प्रणाली प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४१६ गावांमधील महसूल दफ्तर अद्ययावत करण्याचे काम महसूल यंत्रणांनी प्राधान्याने करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज अधिकाºयांना दिले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाºयांसाठी डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ‘ई चावडी’ व ‘ई हक्क’ विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आज घेतली.  त्यावेळी उपस्थित अधिकाºयांना शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. ई फेरफार समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी ई चावडी व ई हक्क प्रणालीविषयक प्रशिक्षण अधिकाºयांना दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, अविनाश शिंदे, अभिजित भांडे पाटील, जयराज कारभारी, बाळासाहेब वाकचौरे, रोहित राजपूत आदी उपस्थित होते.

या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी शिनगारे यांनी ई चावडी व ई हक्क प्रणालीचे महत्त्व विषद केले. या प्रणालीमुळे महसूल प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होईल. त्याचबरोबर नागरिकांनाची सोय होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या गावांची माहिती ई चावडीसाठी आवश्यक अष्टसूत्रीनुसार अद्ययावत तातडीने सुरूवात करण्याचे आदेश शिनगारे यांनी देऊन मार्गदर्शन केले. येत्या डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच गावे ई चावडीवर येण्यासाठी प्रयत्न करू. राज्य शासनाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पुढील काळात याचा तालुका निहाय आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात संगणकिकृत सातबारा प्रकल्प राबविण्यात आला होता. आता शंभर टक्के ई फेरफार हे आॅनलाईन होत आहे. आता त्याची पुढची पायरी म्हणून ई चावडीद्वारे महसूलविषयक आकारणीची माहिती अद्ययावत होत आहे. ई हक्क प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या वारसा नोंद, ई करार, बोजा चढविणे, बोजा उतरविणे, मयताचे नाव कमी करणे, शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव कमी करणे ही कामे करता येणार आहेत. हस्तलिखित व संगणकिकृत सातबारामधील तफावत दूर करण्यासाठी ई हक्कद्वारे अर्ज करता येणार आहे. खातेदारांना त्यांची माहिती आॅनलाईन अद्ययावत करण्याची सोय यामध्ये देण्यात आल्याचे नरके यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे