कर्जत : कर्जतमधील जागतिक कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची निवड अमेरिकेच्या पेस्टल सोसायटी आॅफ वेस्ट कोस्ट या संस्थेने आपल्या ३२ व्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी केली आहे. ही सोसायटी अमेरिकेतील कॅलिफोर्निया या भागातील आहे.पेस्टल सोसायटी आॅफ वेस्ट यांचे हे प्रदर्शन आर्ट सेंटर मोरो-बे, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे सुरू झाले आहे. हे प्रदर्शन १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत असून, या प्रदर्शनात जगभरातून अनेक देशांतून आलेल्या २७ प्रख्यात चित्रकारांच्या चित्रकृती आल्या होत्या. त्यामधून बोरसे यांच्या चित्राला ‘साउथ वेस्ट आर्ट मॅगझिन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रदर्शनात निवड झालेले बोरसे हे एकमेव भारतीय असून, त्यांच्या चित्राला सर्वात जास्त गुणांकन मिळाले आहे. रविवार, १६ सप्टेंबर रोजी परागला यांना कॅलिफोर्नियायेथे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जे. जे. कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या बोरसे यांच्याकडून अनेक राजकारण्यांनी व बड्या उद्योगपतींनी आपली चित्रे काढून घेतली आहेत. आॅस्ट्रेलिया, अमेरिका येथून प्रकाशित होणाऱ्या ‘इंटरनॅशनल आर्टिस्ट’ मॅगझिनमध्ये तीन वेळा पराग यांच्या चित्रांची निवड करण्यात आली आणि त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.