टोकावडे : माळशेज घाटामध्ये बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकांवर आता आधुनिक कारमार्फत करडी नजर राहणार आहे. या कारमध्ये कॅमेरे आणि वेगमर्यादा दाखवणारी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे वेगाची मर्यादा ओलांडणाºया वाहनांची ताबडतोब नोंद होऊ न कॅमेºयामार्फत त्या वाहनांचा नंबर टिपणे सहज शक्य होणार आहे. यामुळे अपघातांबरोबरच गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.
रस्तासुरक्षेसाठी आणि वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस यांच्यातर्फे एक पाऊल पुढे टाकले आहे. उमरोली पोलीस चौकीअंतर्गत माळशेज घाटात दररोज होणारे अपघात आणि त्यांची वेगमर्यादा नियंत्रणात आणण्यासाठी या गाडीचा विशेष फायदा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी ही कार उमरोली पोलीस चौकीला मिळाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याण-नगर हायवेवरील माळशेज घाटातून दररोज हजारो वाहनांची येजा सुरू असते. तसेच ही वाहने घाट चढउतार करत असताना वेगाने जात असतात. एखाद्या वाहनाने वेगमर्यादा ओलांडली असेल, तर उमरोळी पोलिसांच्या ताफ्यात आलेल्या नवीन कारच्या कॅमेºयामध्ये त्याची नोंद होणार आहे.
त्यानंतर, कारला अडवून चालकाविरु द्ध चलन फाडून फाइन आकारण्यात येणार आहे. या पोलीस वाहनात एचडी कॅमेरे बसवले आहेत. दिवसरात्री येजा करणाºया सर्व वाहनांची माहिती नंबरसह पोलिसांकडील ‘बीट मार्शल’ या वाहनाच्या कॅमेºयामध्ये कैदहोणार आहे. तसेच, संबंधित वाहनाच्या काचेवर काळी फिल्म असेल, तर चालकावर गुन्हा दाखल होणार आहेत. ड्रंक अॅण्ड ड्राइव्हप्रकरणीही वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या वाहनामुळे घाटात होणारे अपघात कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अपघात कमी करण्यासाठी होणार फायदा
माळशेज घाट ४० किलोमीटरपर्यंत पसरलेला असून अपघात आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वाहनाचा फायदा होणार असल्याचे उमरोली पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमरसिंग सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार राजेंद्र रसाळ यांनी सांगितले.