ठाणे : जादा प्रवासी नेणारे तसेच भाडे नाकारणाऱ्या शहरातील रिक्षाचालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी आता जोरदार मोहीम उघडली आहे. अवघ्या एक आठड्यातच अशा ४४३ रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७८ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन आठवड्यांपूर्वी शेअर रिक्षातून जादा प्रवासी नेणाºया एका रिक्षाला साकेतजवळ अपघात झाला होता. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक तसेच अन्य तीन प्रवासी जखमी झाले होते. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ १४ मे च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये याबाबत सविस्तर वार्तापत्र प्रसिद्ध झाले होते. याचीच दखल घेऊन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी शेअर रिक्षातून जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया आणि जादा भाडे आकारणाºयांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणेनगर, कोपरी, नौपाडा, कळवा, कासारवडवली, कापूरबावडी आणि मुंब्रा आदी नऊ युनिटच्या वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली. काही ठिकाणी अचानक तपासणीतून तर काही ठिकाणी वेषांतर करून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.ठाणेनगर युनिटच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या पथकाने डॉ. मूस चौक, टेंभीनाका, जांभळीनाका, सिडको बसथांबा, गावदेवी रिक्षा स्टॅण्ड, ठाणे रेल्वेस्थानक आणि हॉटेल अलोक आदी परिसरात १४ ते २० मे रोजी चालकाच्या बाजूला (फ्रंटसीट) प्रवासी घेऊन जाणाºया ४५ रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून पाच हजार ४०० इतका दंड वसूल केला. तर जादा भाडे आकारणाºया १४ चालकांकडून तीन हजार ४०० रुपये दंड वसूल केला.कोपरी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. जी. वाघमारे यांच्या पथकाने आनंद सिनेमा, हासीजा कॉर्नर, कोपरी सर्कल, आनंदनगर, कोपरी ब्रिज, दादा पाटीलवाडी आदी परिसरातून जादा प्रवासी नेणाºया सात रिक्षांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १४०० रुपये दंड वसूल केला. तर नौपाडा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ पाटील यांच्या पथकाने तीनहातनाका, मल्हार सिनेमा, रघुनाथनगर, हरिनिवास सर्कल, अल्मेडा चौक आदी ठिकाणी फ्रंटसीट प्रवासी नेणाºया १६ चालकांकडून दोन हजारांचा दंड वसूल केला. त्यापाठोपाठ कापूरबावडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चौधरी यांच्या पथकाने गोल्डन डाइजनाका, गांधीनगरनाका, ढोकाळी क्रॉस, नळपाडा आणि बाळकुमनाका आदी भागात जादा भाडे आकारणाºया तीन तर फ्रंटसीट नेणाºया ५४ चालकांवर कारवाई करून ९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला.वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या पथकाने नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, वैतीवाडी, रहेजा चौक, मॉडेलानाका, रोड क्र. १६, किसननगर, रामनगर आणि उपवन आदी परिसरात शेअर तसेच इतर रिक्षांतून जादा प्रवासी नेणाºया ६२ चालकांकडून ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कर्डिले यांच्या पथकाने ब्रह्मांड जंक्शन, मानपाडा, आनंदनगर, विजयगार्डन, कासारवडवली, ओवळा आणि नागलाबंदर आदी परिसरातून फ्रंटसीटवर प्रवाशांना नेणाºया ३३ जणांवर कारवाई करुन पाच हजारांचा दंड वसूल केला.तर राबोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. जी. खैरनार यांच्या पथकाने सर्वाधिक कारवाई केली. जिल्हा रुग्णालय कॉर्नर, मुख्य पोस्ट आॅफिस, खोपट आणि मीनाताई ठाकरे चौक परिसरात फ्रंटसीट नेणाºया ७७ चालकांकडून त्यांनी १३ हजार २०० चा दंड वसूल केला. कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या पथकाने विटावा जकातनाका, शिवाजी चौक, पटणी क्रॉस पॉइंट, गणपतीपाडा आणि खारेगाव टोलनाका येथे जादा प्रवासी नेणाºया ६१ चालकांवर १३ हजार ८०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.दंड आकारूनही जादा प्रवासी नेणाºयांवर कारवाईमुंब्य्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या पथकाने मुंब्रा टी जंक्शन, रेतीबंदर, मुंब्रा रेल्वे स्टेशन, शीळफाटा आणि पारसिक रेतीबंदर आदी परिसरात चालकाच्या बाजूला प्रवासी नेणाºया ७० रिक्षांवर कारवाई केली. वारंवार दंड आकारूनही जर पुन्हा जादा प्रवासी नेणाºयांवर आणखी कडक कारवाईची तरतूद करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत सातेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 6:42 AM