- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका हद्दीतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांसाठी गुरवारी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी आयुक्तांना पत्र देऊन शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यासाठी एकदिवसीय लसीकरण मोहीम राबविण्याची विनंती केली होती.
उल्हासनगरातील शाळा उघडण्यापूर्वी मुलांच्या सुरक्षेसाठी महापालिका, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे केली होती. पालिका आयुक्त दयानिधी यांनी याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा करून लसीकरणाला परवानगी दिली. आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रकाश जाधव, वैधकीय अधिकारी डॉ दीपक पगारे , शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी शिक्षकांच्या लसीकरणाला पुढाकार घेतला. गुरवारी २ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर शहरातील सर्व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महापालिका शाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी पगारे यांनी सांगितले.
महापालिका हद्दीतील बहुतांश शिक्षकांनी लसीकरणांचा पहिला डोस घेतला असून राहिलेल्या ३५९ शिक्षाकांना गुरवारी पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या डोस साठी शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षकांनी गुरवारी आधारकार्ड व ओळखपत्र घेऊन लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी दिली. याव्यतिरिक्त लसीकरण झालेल्या शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविडचे सर्व नियम पाळावे. असे आवाहनही मोहिते यांनी केले. शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण येत्या आठवढ्यात पूर्ण होणारपूर्ण होईल. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेचा कौतुकास्पद निर्णय महापालिका आयुक्तांना पत्र दिल्यानंतर, शहरातील सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेण्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी दिली. गुरवारी १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण होणार असल्याने साळवे यांनी समाधान व्यक्त केले. शासनाने टप्याटप्याने शाळा सुरू करण्याचेही सुचविले आहे.