ठाणे : कार तसेच इतर वाहनांना लोखंडी गार्ड किंवा बंपर लावणा-यांवर न्यायालय तसेच केंद्र शासनाच्या आदेशानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. ठाण्यात यासाठी एका विशेष मोहिमेद्वारे ही कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कार तसेच तत्सम वाहनांनी बंपर, बुल बार तसेच क्रॅश गार्ड लावणे हे असुरक्षित आणि धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अशा बंपर आणि लोखंडी बार लावण्यावर ७ डिसेंबर २०१७ च्या पत्रान्वये बंदी आणण्यात आली आहे. अशा प्रकारचे बंपर लावणाºयांवर मोटर वाहन कायद्याच्या सेक्शन ५२ नुसार गुन्हा दाखल करून सेक्शन १९० आणि १९१ अन्वये दंडही आकारला जाऊ शकतो. याच आदेशानुसार राज्य सरकारनेही वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यापाठोपाठ ठाणे पोसिलांनीही असे गार्ड आणि बंपर लावणा-यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत वाहनाच्या समोर आणि बाजूला लोखंडी बार लावणा-यांना एक हजार रुपये दंडाची तरतूद केल्याची माहिती काळे यांनी दिली.काय होऊ शकते...अशा प्रकारचे बंपर किंवा क्रॅश गार्ड लावण्यामुळे अपघात झाल्यानंतर वाहनांमधील सेन्सर अपेक्षितपणे काम करीत नाही. त्यामुळे एअर बॅगही उघडल्या जात नाहीत. एअर बॅग न उघडल्यामुळे चालक गंभीर जखमी होऊन प्रसंगी त्याचा मृत्यूही होऊ शकतो. याशिवाय, बंपरमुळे समोरच्या वाहनाचे तसेच बंपर असलेल्या वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते, अशी माहिती एका आरटीओ अधिका-याने दिली.
ठाण्यात विशेष मोहीम: वाहनांना लोखंडी बंपर लावणा-यांवर होणार कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 8:01 PM
वाहनांवर बेकायदेशीरपणे लोखंडी बंपर लावणा-या चालकांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असून एक हजारापर्यंत दंडही आकारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देकेंद्रीय परिवहनच्या आदेशाची अंमलबजावणीपुण्यापाठोपाठ ठाण्यात कारवाईएक हजारांपर्यंत दंडही होणार