शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

विशेष मुलांनी बनवलेल्या गुढी पोहोचल्या अमेरिकेत

By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 08, 2024 1:21 PM

विश्वास गतिमंद केंद्रातील विशेष मुलांनी आपल्या क्लपकतेतून बनविलेल्या मिनी गुढींकडे अमेरिकेतील भारतीयांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रज्ञा म्हात्रे, ठाणे: विश्वास गतिमंद केंद्रातील विशेष मुलांनी आपल्या क्लपकतेतून बनविलेल्या मिनी गुढींकडे अमेरिकेतील भारतीयांचे लक्ष वेधले असून या मिनी गुढी चक्क अमेरिकेत भेटवस्तू देण्यासाठी गेल्या आहेत. या विशेष मुलांच्या कला कौशल्यांचे ठाण्याबरोबर अमेरिकेतही कौतुक होत आहे. आठ मिनी गुढी या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी खरेदी केल्या आहेत.

सर्वसामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांच्या अंगी देखील कला कौशल्य दडलेले असते या कला कौशल्यांना वाव मिळावा आणि भविष्यात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने विश्वास गतिमान केंद्र कडून विविध वस्तू बनवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. गेली ३४ वर्षे संस्था सण - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू तयार करत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्यानिमित्ताने या विशेष मुलांनी मिनी गुढी तयार केल्या आहेत.

लाल, निळा, हिरवा, भगवा, जांभळा, गुलाबी अशा विविध रंगांच्या खणाच्या कापडापासून तब्बल १०० मिनी गुढी मुलांनी तयार केल्या. या गुढींना सजवले तेसोनेरी, मोती आणि गोंड्यांची माळ, चंदेरी रंगांचा गडू, नारळ, स्वस्तिक आदींनी. एक फुटांच्या या गुढी असून त्या अधिकच आकर्षक दिसत आहेत. या केंद्रातील २२ मुलांनी मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुढी तयार केल्या आहेत. मुलांच्या हाताला सवय झाली आहे त्यामुळे त्यांना एकदा सांगितले की, दुसऱ्या क्षणाला ते बनवायला घेतता. या मिनी गुढी बनविण्याचे यंदाचे हे ३४ वे वर्षे आहे. काळानुसार फक्त कापडात बदल होत गेला. या गुढी बनविताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता अशा भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.

सर्वसामान्यांप्रमाणे खाजगी कंपन्यांनीही या गुढी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. मिनी गुढीप्रमाणे खणांच्या या मुलांनी आपल्या ह्सतकलेतून तयार केलेल्या तोरणांनाही अधिक पसंती मिळाली आहे.

टॅग्स :thaneठाणेgudhi padwaगुढीपाडवा