शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ट्रकच्या धडकेत ठाण्यातील मसाला व्यापाऱ्याचा मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Published: April 25, 2024 10:16 PM

माजीवडा नाक्यावरील घटना: ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घोडबंदर ते ठाणे मार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकने स्कूटरला दिलेल्या धडकेत मितेश निलेश नागडा (३०) या मसाला व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक गणेश एकनाथ कुमावत (२४, रा. नेवाळी, मलंगरोड, कल्याण) याला ताब्यात घेतल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील माजिवडा जंक्शनजवळील नर्सरी समोर घोडबंदरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरुन मितेश हे त्यांच्या स्कूटरवरुन टेंभी नाक्यावरील त्यांच्या घरी जात होते. त्याचवेळी पाठीमागून त्याच मार्गावरुन येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात मितेश हे गंभीर जखमी झाले. त्यांना कापूरबावडी पोलिसांनी कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या गणेश कुमावत या चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे हयगयीने वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात