मुंब्रा : स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात आयोजित केलेल्या लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत रविवारी मुंब्र्यातील रेतीबंदर परीसरात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात ७९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये फाउंडेशनच्या सदस्यांची संख्या उल्लेखनीय होती.
निरंकारी मिशनचे केंद्र संयोजक बाबूभाई पांचाळ यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मिशनच्या युनिट क्रमांक ८७४ चे मुखी (प्रमुख) पाडुरंग संते सत्संग इन्चार्ज बालाजी केळकर, सेवादल शिक्षक ब्रह्मजित क्रहार, संचालक दिनकर सोनार तसेच बाळू कासार आदी उपस्थित होते.
यांनी केले रक्तदान
शिबिरात रामचंद्र प्रजापती, जितेंद्र गुप्ता, मांगीलाल दिवासी, दुर्गाराम दिवासी, अमर दिवासी, प्रभू नाईक, अर्चना नाईक, हेमंत दिवासी, जनार्दन पाटील, राजेद्र लव्हांडे, विश्वनाथ दुधे, रामशंकर प्रजापती, ब्रिजलाल कन्होजिया, मयूर बेर्डे, संजीव गुप्ता, श्रेयस संते, सतीश ,चंदर चव्हाण, चंद्रकांत झोरी, सागर पावलकर, सागर चव्हाण, सपना बोबले, बालाजी पावलकर, राहुल पाल, दीपक ओझा, अनिकेत पाटील,राजेंद्र पवार, सतीष पाजी, निखिल गायकवाड, अश्विनी पाटील, अकुंश हिलाल, गणेश पवार, कुणाल पाटील, ज्योस्ना म्हात्रे, विश्वनाथ चौधरी, संजीवनी येवले, मातादिन पाठक, राहुल यादव,सुनील, सुधीर ठाले, सागर पाटील, विजय गुप्ता, प्रकाश मोरे, विनायक पाटील, विलास चांदिवले, प्रमोद पष्टे, धीरज यादव, अनिकेत पष्टे, सुरेश कालेकर, रामदरस जैयस्वार, रामधनी राम, उपेनदेव राम, मंदार बेर्डे, राहुल मोर्या, मंगेश चौधरिया, सूर्यकांत हेमंत, सिद्धार्थ लांडगे, चेतन लाड, अमर प्रजापती, हिरावाती विश्वकर्मा, आशोक विश्वकर्मा, दक्षता पाटील, मनोज वाघमारे, हिमाली ठाकूर, किरण श्रीमंत, सागर जोशी, राहुल पाटोळे, राहुल चव्हाण, शुभम आशोक, नागेश उत्तम, गोपाल पावसकर, राहुल वलसंगेसागर येवले, नरेंद्र चंद्रे, विलास कदम, संदीप बोऱ्हाटे, रोहित मोर्या, अनिल म्हात्रे, अनिता गवाडे यांनी रक्तदान केले.
*शिबिराला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण, परिवहन समितीचे सदस्य शमिम खान, समाजसेवक मोतीराम भगत, अनू अंगरे, राहुल कांबळे, प्रकाश रायबोले, बंडू वाव्हळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वॉर्ड अध्यक्ष सीमा बडदे, ब्लॉक अध्यक्ष बबलू शेमना, आप्पाराव हिलाल आदी मान्यवर उपस्थित होते.
**