ठाणे : ५००व्या अभिनय कट्ट्याचा वेध घेतलेल्या अभिनय कट्ट्याला कोरोनाचे बदलही रोखू शकले नाही. अभिनय कट्ट्याचे संस्थापक किरणा नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्याच्या रंगकर्मीनी लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी ऑनलाइन अभिनय कट्टा सादर केला.
सरकारच्या आदेशानुसार जमाव बंदी आहे सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसल्यामुळे आठवड्याभराचा ताण विसरायला येणाऱ्या अभिनय कट्ट्याच्या कुटुंबीयांचा हा रविवार कोरोना मुके घरातच जाणार अस वाटत असताना अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी एक काव्यसंध्या त्यांच्या मोबाईल वर अनुभवायला देऊन जणू सुखद धक्काच रसिक मायबाप प्रेक्षकांना दिला. अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी काव्यसंध्या हा कार्यक्रम रेकॉर्ड करून रविवारी संध्याकाळी आपल्या फेसबुक पेज वरून रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला आणला.तसेच सादर कार्यक्रमाची लिंक अभिनय कट्ट्यावर येणाऱ्या लाडक्या प्रेक्षकांना मोबाईलवर पाठवण्यात आली.प्रेक्षकांनीही लाईक कंमेंट करून सदर कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आणि आयुष्यावर भाष्य करणाऱ्या विविध कवितांचे सादरीकरण काव्यसंध्या ह्या कार्यक्रमात करण्यात आले. *अभिनय कट्ट्याचे कलाकार कादिर शेख ह्याने सुरेश भट ह्यांची 'जगत मी आलो असा की..' आणि एक संग्रहित कविता 'दुःखाने दिली पार्टी' सादर केली,आदित्य नाकती ह्यांने 'शाळा संपताना..' आणि गुरू ठाकूर ह्याची 'असे जगावे..' ह्या दोन कविता सादर केल्या.सोनल पाटील हिने संदीप खरे ह्यांची 'मैत्रीण..' ही कविता सादर केली.परेश दळवी ह्याने स्वलिखित 'कस जगावं या जगात..', वि.दा. करंदीकरांची 'तुकारामा भेटी शेक्सपिअर आला' आणि संग्रहित 'लग्न लग्न म्हणजे काय' ह्या कविता सादर केल्या.आजच्या परिस्थितीत पुन्हा सावरून उभं राहण्यासाठी प्रेरणा देणारी सुरेश भटांची 'विझलो आज जरी मी...' आणि गुरू ठाकूर ह्यांची 'यल्गार' ह्या कविता अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी सादर केल्या.सादर कार्यक्रमाचे छायाचित्रण,संकलन अभिनय कट्ट्याचा कलाकार अथर्व नाकती ह्याने केले.* सादर कार्यक्रमाला सोशल मीडियावर सुंदर प्रतिसाद मिळत आहे. कोरोना खरच एक जागतिक संकट आहे त्याच्याशी आपण मिळून लढा देणं गरजेचं आहे .त्यासाठी असलेले नियम आपण पाळणे गरजेचं आहे.म्हणूनच सरकारच्या आदेशानुसार गर्दी टाळण्यासाठी आम्ही ऑनलाइन कट्टा हे पाऊल उचलले. अभिनय कट्टा अविरत चालत आहे ह्याचे खरे कारण इथला कट्टेकरी आणि आम्हाला शाबासकी आणि आशीर्वाद देणाऱ्या आमच्या रसिक मायबाप प्रेक्षक जे आमचे कुटुंबीय आहेत.कट्ट्यावरच सादरीकरण त्या प्रेक्षकांना आठवड्याभराच्या दगदगी नंतर मनोरंजन मनाला एक वेगळं समाधान देत आणि ते आम्हाला कलाकार म्हणून ऊर्जा देतो म्हणून हा एक आगळावेगळा प्रयत्न आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत आहे असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.