ठाणे: जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ला या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकल मराठा मोर्चाच्या वतीने आज ठाणे बंदची हाक दिली होती. या बंदला ठाण्यात सकाळी तुरळक प्रतिसाद पाहण्यास मिळाला. जरी ठाण्याची बाजार पेठे आणि शहरातील काही भागात दुकाने उघडण्यात आला नसली तरी रिक्षा, बसेस धावताना दिसत होत्या. अखेर मराठा समाजाचे नेतेमंडळी रस्त्यावर उतरल्याचे ही पाहण्यास मिळाले.
या बंदाला शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस या पक्षांनी पाठींबा दिला असताना, सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही पाठींबा जाहीर केला होता. दरम्यान ठाणे बंदसाठी मनसे रस्त्यावर उतरली होती. रिक्षा, खासगी वाहन व दुकानदारांना दुकान बंद करण्याचे मनसे पदाधिकार्यांनी जागोजागी आवाहन केले. पाचपाखाडी भागात टीएमटी सेवा रोखण्याचा प्रयत्न बंद सर्मथकांकडून करण्यात आला. माञ पोलिसांनी वेळीच धाव घेत या मार्गावरील बस पुढे रवाना झाली. तसेच चौकाचौकात पोलीस बंदोबस्त पाहण्यास मिळत होता.