शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तलवारबाजीतील पारंगत ठाण्यातील  पुजा आवारेला बेस्ट एनसीसी कॅडेटसह स्पोटर््सवुमेन आवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:02 PM

पुजाच्या परिश्रमाची दखल घेऊन तिची ‘बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्डसाठी निवड केली. या सर्वोत्कृष्ट आवार्डसह ‘बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड’ ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान यांनी देऊन पुजाला सन्मानित केले

ठळक मुद्दे एनसीसीचा बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्ड व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्डशासनाच्या स्टेटलेव्हल कॅम्पीएनशीपमध्ये तलवारबाजी दांडपट्टा स्पर्धेत सिलवर मेडलआतापर्यंत तिने चार गोल्ड मेडल, चार सिलवर आणि सहा ब्राऊन मेडलची कमाई

ठाणे : ईटीव्हीवरील ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मराठी मालिकेतील दांडपट्टा व तलवारबाजीचे खास प्रात्याक्षिक दाखवून सर्वाची वाहवाह मिळवणारी येथील पुजा दिपक आवारे या विद्यार्थीनीने एनसीसीचा बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्ड व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड प्राप्त करून आपल्या खेळाडू वृत्तीची झलक दाखवून दिली आहे.येथील प्रसिध्द ज्ञानसाधना महाविद्यालयात एफवायबीएला असलेल्या पुजाने अवघ्या १९ वर्षाच्या कालावधीत राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या ‘तलवारबाजीसह दांडपट्टा’ स्पर्धेत नावलौकिक मिळवले आहे. या महाविद्यालयीन शिक्षणा दरम्यान एनसीसीत विविध स्पर्धांचे पारितोषीक पटकवले आहेत. यामुळे ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एनसीसी शाखेच्या लेफ्टनंट कर्नल राधीका मुखर्जी यांनी पुजाच्या परिश्रमाची दखल घेऊन तिची ‘बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्डसाठी निवड केली. या सर्वोत्कृष्ट आवार्डसह ‘बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड’ ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान यांनी देऊन पुजाला सन्मानित केले.महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात हा कार्यक्रम बुधवारी समारंभपूर्वक पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थीवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होता. वर्तकनगरमध्ये लहानश्या घरात राहणाºया या पुजाने सांगली येथे पार पडलेल्या राज्य शासनाच्या स्टेटलेव्हल कॅम्पीएनशीपमध्ये तलवारबाजी दांडपट्टा स्पर्धेत सिलवर मेडल प्राप्त केले आहे. भंडारा येथील तलवारबाजी दांडपट्टा स्पर्धेतही तिने सिलवर मेडल पटकवले आहे. एनसीसी, एनएसएस आणि सिव्हील डिफेन्स शाखेत कार्यरत असलेल्या पुजाने विविधि स्पर्धांमध्ये बाजी मारून आतापर्यंत तिने चार गोल्ड मेडल, चार सिलवर आणि सहा ब्राऊन मेडलची कमाई केल्याचे पुजाचे वडील दिपक आवारे यांनी सांगितले आहे. त्यात आता बेस्ट एनसीसी कॅडेट व बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्डची भर पडली आहे. विद्यार्थीनीवयात पुजाने आतापर्यंत केलेल्या कार्याचे कौतूक करीत तिचा सत्कार आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील शुक्रवारी करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.................फोटो - १६ठाणे एनसीसी आवार्ड

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार