शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

भ्रष्टाचारी केडीएमसी बरखास्त करा

By admin | Published: June 20, 2017 6:30 AM

शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी दिलेले फेरीवाल्यांच्या हप्त्याचे रेट कार्ड आणि स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी टेंडर प्रक्रियेमधील भ्रष्टाचाराची केलेली पोलखोल याची

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी दिलेले फेरीवाल्यांच्या हप्त्याचे रेट कार्ड आणि स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी टेंडर प्रक्रियेमधील भ्रष्टाचाराची केलेली पोलखोल याची सखोल चौकशी करावी, तोपर्यंत केडीएमसी बरखास्त करावी, अशी मागणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केडीएमसीतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असलेल्या वामन म्हात्रे यांनी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात डोंबिवलीत लाक्षणिक उपोषण छेडले आहे. यात त्यांनी फेरीवाल्यांकडून अधिकाऱ्यांना कोणत्या परिसरात, किती हप्ता मिळतो, याची यादीच जारी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती रमेश म्हात्रे यांनी टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. याकडे लक्ष वेधताना मनसे उपाध्यक्ष कदम यांनी महापालिका बरखास्त करून या आरोपांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महापालिकेच्या कारभारात खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवकच करीत आहेत. वामन म्हात्रे यांनी तर कुठल्या रस्त्यावर किती हप्ता द्यावा लागतो, याचा तक्ताच सादर केला आहे. तसेच पालिकेची तिजोरी म्हणून ज्या स्थायी समितीला संबोधले जाते त्या समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी तर महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नावासह आरोप केले आहेत. महापालिकेची गोल्डन गँग टेंडर माफियांना टेंडर सेटिंगमध्ये मदत करते, असा आरोप त्यांनी केला आहे. टेंडर सेटिंग होते म्हणजेच निकृष्ट कामे होतात आणि यात महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. याचाच अर्थ जे महापालिकेत गेली २०-२२ वर्षे सत्तेत आहेत, ते या मोठया भ्रष्टाचाराला निपटण्यास असमर्थ ठरले आहेत हे त्यांच्याच नगरसेवकांच्या आरोपातून सिध्द होत असल्याकडे कदम यांनी लक्ष वेधले आहे. राज्याचे प्रमुख म्हणून या भ्रष्टाचाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. अन्यथा आम्हाला तक्रारीचे इतर पर्याय सुध्दा उपलब्ध आहेत, असेही कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.