ठाणे - मुंब्रा येथील वाय जंक्शन पूलाच्या उद्धाटनावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात श्रेयवाद पाहायला मिळाला. तुम्ही खासदार नव्हते, माझ्या कारकिर्दीत हा प्रकल्प आला असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यावर आम्ही आल्यावर हा प्रकल्प झाला. पैसे आम्हीच दिले होते. आमच्या सरकारच्या काळात पैसे मिळाले असं प्रत्युत्तर दिले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २७-२८ वर्ष एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र काम केले आहे. ब्रीज तयार होऊन ३ महिने झाले तरी जोवर एकनाथ शिंदे उद्धाटनाला येणार नाही तोपर्यंत उद्धाटन होणार नाही असं मी मनसेवाल्यांना सांगितले. मी करणार आहे. तेव्हा हा ब्रीज १ महिना पूर्ण होऊन झाला असं श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना विचारत सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत वाद संपवला.
हा वाद व्हिडिओत कैद झाला त्यावर आव्हाडांना प्रतिक्रिया विचारली असता शाब्दिक चकमक वैगेरे झाली नाही. मला कामाचं क्रेडिट घ्यायचं नाही.ज्यांना कामाचं क्रेडिट घ्यायचं आहे त्यांना बकबक करावी लागते. ठाण्यापेक्षा कळवा-मुंब्रा मतदारसंघात भरपूर कामे झाली. ती कामे कुणी केली हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे कशाला वाद विवाद घालू असं आव्हाडांनी म्हटलं.
त्याचसोबत तो आता मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्याच्याशी बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. यंत्रणा त्यांच्याकडे आहे. आत्ताच आम्हाला धमकी मिळाली. किती दिवस जेलमध्ये बसाल तुम्हाला कळणारही नाही. घाबरलं पाहिजे ना. सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू, मग बघू तुम्हाला कोण जामीन देतो? अशा धमक्या मिळणार असतील तर गाव सोडूनच गेलेले बरे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. शिंदे-आव्हाडांमध्ये श्रेयवादाची लढाईकळवा ब्रीज आणि मुंब्रा ब्रीज आज या दोन्ही पुलाचे उदघाट्न होतं आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. गेले २ महिने मी सातत्याने ही मागणी करत होतो की, मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून ह्या दोन्ही पुलाचे उदघाट्न करावे. खरंतर हे उदघाट्न आम्ही आमच्या पद्धतीने पार पाडू शकलो असतो. पण सामंजस्य दाखवून ह्या पुलाचे उदघाट्न मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते व्हायला हवं. कारण का माझ्या मतदार संघातील एवढ्या मोठ्या कामाचे उदघाट्न मुख्यमंत्र्यांनी केले ह्याचा मला आनंद लुटायचा होता आणि आज त्याचे उदघाट्न होत आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आभारी आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.