डोंबिवली : अत्यावश्यक सेवेतील व सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वे सुविधा आहे, परंतु खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी बसशिवाय पर्याय नाही. बससाठी आम्ही तासन्तास रांगेत उभे राहतो. आम्हाला वेळेत बस मिळायला हवी, त्यासाठी बसफेºया वाढवा, अशी मागणी करत संतप्त प्रवाशांनी गुरुवारी सकाळी पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मंत्रालयासाठी सोडण्यात येणारी बस रोखून धरली.
ठाण्याला जाण्यासाठी अनेक जण पहाटेपासून रांगेत उभे होते. मात्र, सकाळी ८ वाजले तरी मंत्रालयासाठी बस सोडण्यात आल्या. त्यामुळे ठाणे बस कधी सोडणार, असा संतप्त सवाल करत प्रवाशांनी बस रोखून धरली. आधी ठाणे बस सोडा, त्याशिवाय कोणतीही बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. अखेर, प्रवाशांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळाने एक बस ठाणे मार्गावर सोडली. या बसची घोषणा होताच ठाण्यात जाऊ इच्छिणाºयांची बसमध्ये चढण्यासाठी झुंबड उडाली. परिणामी, तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.
यासंदर्भात एसटीच्या बस नियंत्रण व्यवस्थापनाने सांगितले की, मंत्रालय मार्गावर बस सोडल्या, असे प्रवाशांचे म्हणणे चुकीचे आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच मंत्रालयासाठी बस सोडण्यात आल्या आहे. ठाणे डेपोसाठी आलेल्या बस ठाण्याला सोडतो. गुरुवारी काही बस वाहतूककोंडीत अडकल्याने समस्या निर्माण झाली होती. प्रवाशांनी संयम राखावा आणि कोरोनाच्या धर्तीवर नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
लेटमार्कमुळे नाहक नुकसान : अनेक कंपन्यांमध्ये बायोमेट्रिक अथवा संगणकीय हजेरी पद्धत आहे. त्यामुळे बस अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे कामावर येण्यास उशीर झाला, तर त्याचा नाहक फटका सोसावा लागतो. अगोदरच आर्थिक परिस्थिती भीषण असताना, आणखी नुकसान होत असल्याने कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.
खड्डे, कोंडी अन् कामावर येण्याची सक्ती
च्सातत्याने मागणी होऊनही रेल्वेसेवा सुरू केली जात नाही. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे. त्यात खासगी वाहनांनी जायचे म्हणजे तिकीट अथवा प्रवासावर खूप पैसे खर्च होतात. सामान्यांनी जगायचे कसे? आम्ही नोकरी टिकवायची म्हणून जीव धोक्यात घालून प्रवास करतो, पण आम्हाला होणाºया त्रासाचे काय, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांनी केला.
च्कल्याण-शीळ महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यात वाहतूककोंडी होते, त्यामुळेदेखील आम्ही त्रस्त आहोत. सरकार लक्ष घालत नाही आणि कंपन्यांमध्ये वरिष्ठ कामावर येण्याची सक्ती करतात. या परिस्थितीमुळे सामान्यांची अडचण होत आहे. याकडे कोणी लक्ष देईल का, असाही सवाल नागरिकांनी केला.