- शाम धुमाळ
कसारा- मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व रेल्वे वाहतूक बुधवार रात्री पासून बंद असल्याने कसारा रेल्वे स्थानकात अनेक गाड्या उभ्या होत्या. त्यात अनेक प्रवासी अडकले होते.आज सकाळी अडकलेल्या प्रवासासाठी ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या आदेशाने कसारा रेल्वे स्थानकाकडे एस टी बस पाठवण्यात आल्या शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवले, तहसीलदर नीलिमा सूर्यवंशी,प्रभारी अधिकारी केशव नाईक,रेल्वे सुरक्षा पोलीस अधिकारी हनुमान सिंग ,रेल्वे अधिकाऱ्यांनी.नियोजन करित कसारा रेल्वे स्थानकात अडकलेल्या तब्बलं २५०० प्रवाशांना बस ने इच्छित स्थळी सोडण्यात आले या साठी तब्बल् ४६ बस सोडण्यात आल्या होत्या. तर ४० बस इगतपुरीत अडकलेल्या प्रवश्यासाठी रवांना करण्यात आल्या.
बुधवारच्या पावसात कसारा परिसरात् झालेल्या विविध ठिकाणच्या नुकसानी बाबत शिवसेना.नेते एकनाथ शिंदे यांनी दखल घेत संबंधित नुकसानीची व रेल्वे नुकसानबाबतची पाहणी व दरड कोसळून नुकसान ग्रस्त घराची पाहणी करून त्यांना मदत करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,पांडुरंग बरोरा,मारुती धिरडे,मंजुषा जाधव यांच्या सहशिवसैनिकांनी नुकसान ग्रस्त घराची पाहणी करून मदत दिली.