शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

आषाढीसाठी झाली लाल परी सज्ज; ग्रुप बुकिंगला प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 12:15 AM

आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फेराज्याच्या विविध भागांतून ३७२४ बस सोडण्यात येणार आहेत.

ठाणे : आषाढी एकादशीला भक्तिभावाने श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पायी निघाले आहेत. तर, १२ जुलैच्या यात्रेनिमित्त महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ८ ते १२ जुलैदरम्यान विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार, त्या पाच दिवसांत आतापर्यंत ९६ बस जाण्यासाठी, तर परतीच्या प्रवासासाठी ५७ एसटीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. तसेच पंढरपूरला जाण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी पाहून आणखी जादा बस सोडल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फेराज्याच्या विविध भागांतून ३७२४ बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनंतर परतीच्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण जादा बसपैकी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाणे विभागामार्फत गतवर्षी सरासरी ६५ बस सोडल्या होत्या. पण, यंदा सरासरी ८३ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. साधारणत: ठाणे विभागातून दिवसभरात ३२ बस बुकिंगसाठी असणार आहे. तसेच नियोजित केलेल्या ८३ बस ठाणे विभागातील ठाणे (१), ठाणे (२), भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी आणि वाडा अशा आठ डेपोंमधून सोडण्यात येणार आहेत. त्यातच, पंढरपूरसाठी ८ जुलै रोजी २० गाड्यांचे बुकिंग झाले आहे.९ जुलैला १९, १० जुलै २२, ११ जुलैला १६ आणि १२ जुलै १९ एसटी बसगाड्यांचे बुकिंग केले आहे. तर, परतीचा प्रवास हा १३ ते १५ जुलैचा असल्याने त्या तिन्ही दिवसांमध्ये प्रत्येकी १९ अशा ५७ गाड्या फुल्ल झाल्या आहेत. आॅनलाइन तिकीट बुकिंगमध्ये एक बस भरल्यावर दुसऱ्या बस बुकिंग सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वैयक्तिक बुकिंगद्वारे आरक्षणग्रुप बुकिंगची व्यवस्थाही यंदा ठेवली होती. त्यानुसार, ग्रुपचे आवाहन करूनही आतापर्यंत कोणीही ग्रुपद्वारे पंढरपूरला जाण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे यंदा ग्रुप बुकिंगपेक्षा वैयक्तिक बुकिंगद्वारे आसने आरक्षित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे