डोंबिवली- शहाड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना मंगळवारी रात्री 8.30च्या सुमारास घडली. त्यामुळे कसारा मार्गावरील लोकल व लांब पल्ल्याची वाहतूक कोलमडली. त्याचा फटका घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना बसला. या घटनेमुळे राज्यराणी, पंचवटी आणि विदर्भ या लांब पल्ल्यांच्या गाड्या खोळंबल्या. तसेच लोकल वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. अखेरीस अर्ध्या तासाने रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी वाहतूक सुरू झाली. रुळाचा तडा दुरुस्त केल्यावरही वाहतूक घटनास्थळावरून धीम्यागतीने पुढे धावली. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक रात्री उशिरापर्यंत अर्ध्या तासाने विलंबाने धावले. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनीही त्यास दुजोरा दिला.
मध्य रेल्वे मार्गावर रुळाला तडा, लोकल वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 9:42 PM