शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

स्फोटाच्या ठिकाणी सापडल्या तारा

By admin | Published: March 18, 2017 2:27 AM

अंबरनाथच्या मिरचीवाडी येथील डोंगरावर झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी तारांचे तुकडे सापडले आहेत. यामुळे स्फोटाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथच्या मिरचीवाडी येथील डोंगरावर झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी तारांचे तुकडे सापडले आहेत. यामुळे स्फोटाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सुरुवातीला हा स्फोट मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या कमी क्षमतेच्या स्फोटकांमुळे घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, घटनास्थळी बॉम्बशोधक पथकाला तारेचे तुकडे सापडल्याने हा स्फोट घडवण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकी कोणती स्फोटके होती, हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या स्फोटानंतर आता तपास यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. स्फोटाची क्षमता ही तीव्र असल्याने स्फोटके आली कुठून आणि ती ठेवली कोणी, हेदेखील तपास यंत्रणेपुढील आव्हान आहे. दगडखाणीतील स्फोटकांना एकत्रित करून त्या स्फोटाची चाचणी केली असावी किंवा जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करून इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरच्या मदतीने स्फोट घडवला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. हा स्फोट म्हणजे तयार केलेल्या बॉम्बची चाचपणी तर नाही ना, या दिशेनेही तपास सुरू आहे. स्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवालानंतर स्फोटकांची माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)आदिवासींना नुकसानभरपाई द्या : किणीकरदुसरीकडे या स्फोटामुळे ज्या आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना सरकारकडून भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे. आदिवासींच्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणीही केली आहे.