ठाणे : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ आता दुसऱ्या टप्यातील लसीकरणाला हिरवा कंदील देत ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वत: शनिवारी लस घेतली. याशिवाय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनीही लस घेऊन पोलीस कर्मचारी, अधिका:यांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे.
येथील सिव्हील रूग्णालयात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे लसीकरण पार पडले. या दरम्यान दिल्ली येथील या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दक्षता पथकाने सिव्हील रूग्णालयाला भेट देऊन केंद्रांतील लसीकरणाच्या नियोजनासह आतार्पयतच्या कामकाजाची माहिती घेतली. करोनाची लस घेणा:या अधिकारी व कर्मचा:यांनी घाबरून न जाता त्वरीत लस घेण्याचा लाभ घ्यावाए असे आवाहन नार्वेकर यांनी केले. यावेळी त्यांनी देखील आपले ओळखपत्र दाखवून ऑक्सिजन तपासणी केली. त्यानंतर लसीकरण केंद्रात जावून लस घेतली. जिल्हह्यातील पहिल्या टप्यातील या लसीकरणाचे 75 टक्के कामपूर्ण झाल्याचे स्पष्ट करून आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगितले.
सिव्हील रूग्णालयातील या लसीकरणाच्या वेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, भिवंडीचे उप विभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, सिव्हीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात 16जानेवारीपासून करोना लसीकरण मोहीम जिल्हात सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात आली तर आताच्या दुसा:या टप्प्यात महसूल, पोलीस अधिकारी कर्मचारी यांना लस देण्याचे काम सुरू झाले आहे.