लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या पाच जलकुंभावरून टँकर पॉर्इंट सुरु करा अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी केली आहे. टँकर पॉईंटवरील घोटाळे व टँकरमाफियांविरोधात तक्रारी असूनही आणखी टँकर पॉर्इंट सुरु करण्याची मागणी पाटील यांनी केल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. मीरा- भार्इंदरमधील टँकर लॉबीला मिळालेला राजाश्रय व राजकारण्यांशी हितसंबंध नवीन नाहीत. याच टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पालिकेच्या जलकुंभातून टँकर पॉर्इंट सुरू करण्यात आले होते. शहरातील जेसल पार्क, फाटक, नवघर, एमआयडीसी, सिल्वर पार्क, कनकिया, भार्इंदर आदी जलकुंभावरून दिवसरात्र टँकरची ये-जा सुरू असते. किती पाणी व टँकर भरले जातात याचा पायपोस पालिकेला नव्हता. टँकरमुळे रस्त्यांचीही दुरवस्था झाली.नळजोडणीला पाणी नाही पण जास्त पैसे मोजून टँकरने पाणी नागरिकांना मिळण्याचा उफराटा कारभार शहरात सर्रास सुरू होता. तत्कालिन उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी या कारभाराला विरोध करत केवळ फाटक वगळता सर्वच टँकर पॉर्इंट बंद करायला लाऊन पालिकेच्या संगनमताने चाललेली लॉबीची लूट मोडून काढली. तेव्हापासून अनेक वर्ष केवळ भार्इंदर फाटक येथील टाकीवरूनच टँकर भरले जात आहेत. पालिकेने टँकर कंत्राटी पध्दतीने घेतले असून वास्तविक पालिका आस्थापना वा जेथे जलवाहिनी नाही अशा ठिकाणीच टँकरने पाणी पुरवणे अपेक्षित असताना सर्रास नगरसेवक वा अधिकाऱ्यांच्या सोयीने टँकर पुरवले जातात. येथील टँकर काळ््या बाजारात विकले जाणे, बोगस नावाने वा आवश्यकता नसताना त्या नावे टँकर पुरवणे आदी गैरप्रकार नेहमीच चर्चेत राहिल्याने टँकर पॉर्इंट बंद करण्याची मागणी सातत्याने होत आहे. असे असतानाही नवीन पॉर्इंट सुरू करण्याची मागणी आश्चर्यकारक आहे.
पाच जलकुंभावरून टँकर सुरु करा
By admin | Published: May 26, 2017 12:01 AM