- सुरेश लोखंडेठाणे - मेट्रोपाठोपाठ आता बुलेट ट्रेनसाठी आवश्यक १९ हेक्टर शेतजमीन संपादन व मोजमापाच्या कामास सोमवार, ७ मे पासून प्रारंभ होत आहे. यामध्ये सुमारे २५० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. शेतकºयांचा प्रचंड विरोध असतानाही ठाणे तालुक्यातील सुमारे १९ गावांच्या शेतकºयांचे सुमारे १०४ प्लॉट या शेतजमिनीच्या संपादनासाठी जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या भूमी अभिलेख विभागाने यासाठी सर्व तयारी केली आहे.या शेतजमिनीच्या संपादनास आधीच विरोध करणाºया शेतकºयांमध्ये सर्वतोपरी जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. प्रतिसाद देत नसलेल्या शेतकºयांना लोकहिताच्या दृष्टीने बुलेट ट्रेनचे महत्त्व पटवून देण्यात आले. तरीदेखील या मोजमापाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क केली आहे. कमी वेळेत जास्तीतजास्त मोजमाप व्हावे, याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे केला जाणार आहे. ११ मे पर्यंत या पहिल्या टप्प्यातील शीळ, डावले, पडले, आगासन, बेतवडे, लहानी देसाई, मोठी देसाई आदी गावांच्या शेतकºयांच्या शेतजमिनी व सरकारी जमिनींचे मोजमाप करण्यात येणार आहे.जागतिक दर्जाच्या या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन देत असलेल्या शेतकºयांनी भरपाईच्या पॅकेजसह शेतकरी व त्यांच्या परिवाराचे पुनर्वसन आदींसाठी वेळोवेळी लक्ष वेधले आहे. बीकेसीतून ठाण्यात येणारी ही बुलेट ट्रेन ठाणे खाडीमार्गे कोपरखैरणे, महापे, शीळ असा वळसा घेऊन आागासन, म्हातार्डेमार्गे भिवंडीहून पालघर जिल्ह्यात जाणार आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान ताशी ३२० किमीच्या वेगाने धावणाºया बुलेट ट्रेनवरून राजकीय टीकेची झोड उठत आहे. अजूनही विरोधाची धार कमी झालेली नाही. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा देऊन ती अधिक तीव्र केली आहे. अशा परिस्थितीत भूसंपादनाच्या मोजणीला प्रांरभ होत आहे. केंद्र सरकारच्या या बुलेट ट्रेनसाठी ठाणे तालुक्यातील सुमारे १९ हेक्टर शेतजमिनीचा वापर होणार आहे. त्यासाठी शेतकºयांच्या खाजगी शेतजमिनीची खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याबाबत जागेची संयुक्त मोजणी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने करण्याचे निश्चित केले आहे. ठाणे तालुक्यातील नऊ गावांमधील १०४ प्लॉटवरील १९ हेक्टर जागा लागणार आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेऊन संयुक्त मोजणी तातडीने करण्यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाण्याच्या खाडीत ४० मीटर खोल बोगद्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे. ठाणे परिसरात येताना ती ठाणे खाडी, कोपरखैरणे, सावली, घणसोली, महापे, अडवली, भुतवली अशी शीळपर्यंत भुयारी मार्गाने धावणार आहे. शीळ येथून ती डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे, म्हातार्डी अशी एलिव्हेटेड (उड्डाण) मार्गाने जाणार आहे. यानंतर, ही बुलेट ट्रेन भिवंडी तालुक्यातील उसरघर, भारोडी, अंजूर, सारंग, सुरई, मानकोली, दापोडे, दिवे, अंजूर, केशळी, पुरने, काल्हेर, कोपर, केवानी, खारबाव, मालोडी, पायगाव, पोये, दिवे, वसई खाडी अशी पुढे पालघर जिल्ह्यात जाणार आहे.ठाणे जिल्ह्यातील मार्ग ३९.६६ किं.मीबुलेट ट्रेनसाठी मुंबई ते अहमदाबाद असा सुमारे ५०८.१० किलोमीटरचा मार्ग असून ठाणे जिल्ह्यातील मार्ग ३९.६६ किलोमीटर आहे. या मार्गाची रु ंदी १७.५ मीटर इतकीच राहणार असून बीकेसीपासून ठाणे तालुक्यातील शीळपर्यंत २१ किलोमीटरचा मार्ग भूमिगत असून त्यापुढे मात्र ४८७ किलोमीटर म्हणजे अहमदाबादपर्यंत ती एलिव्हेटेड- उड्डाणमार्गावरून जाईल. हा मार्ग जमिनीपासून १० ते १५ मीटर उंच असेल. दोन खांबांतील अंतरही ३० मीटर इतके असणार आहे.
उद्यापासून बुलेट ट्रेनसाठीच्या शेतजमिनीची मोजणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:06 AM