शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

अत्याधुनिक ४० टोइंग वाहने आता दिमतीला

By admin | Published: May 01, 2017 6:15 AM

टोइंग वाहनांकडून होणाऱ्या कारवाईबाबत ठाणेकरांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याकरिता मुंबईच्या धर्र्तीवर ठाणे शहर

ठाणे : टोइंग वाहनांकडून होणाऱ्या कारवाईबाबत ठाणेकरांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याकरिता मुंबईच्या धर्र्तीवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत तब्बल ४० अत्याधुुनिक टोइंग वाहने सेवेत दाखल करून घेण्यात येणार आहेत. या वाहनांवर जीपीएस, ध्वनिक्षेपक, कॅमेरा व हायड्रॉलिक यंत्रणा असणार आहे. या वाहनांच्या खरेदीकरिता वाहतूक शाखेने ई-निविदा मागवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने टोइंग करण्यासाठी तसेच महामार्गावर बंद पडणारी अवजड वाहने बाजूला करण्यासाठी वाहतूक शाखेने चार प्रकारच्या वाहनांकरिता निविदा मागवल्या आहेत. यामध्ये दुचाकी वाहने टोव्ह करण्यासाठी २४, चारचाकी वाहनांसाठी ८, लहान क्रेन ५ आणि मोठ्या क्रेन ३ अशा एकूण ४० वाहनांचा समावेश आहे. डिझाइन, बिल्ट, आॅपरेट अ‍ॅण्ट मेन्टेन (डीबीओएम) या तत्त्वावर दीर्घकाळासाठी या वाहनांबाबत करार करण्यात येणार आहे. यासाठी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती स्थापन केली असून ही वाहने मे २०१७ मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होतील, असा विश्वास ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)असा असेल पारदर्शकपणावाहन टोव्ह करण्यापूर्वी त्याचा फोटो काढण्यात येईल व जीपीएस लोकेशनची नोंद केली जाईल. वाहनांचे हायड्रॉलिक पद्धतीने टोइंग केल्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच किती वाहने टोव्ह केली, त्याबाबत नियंत्रण कक्षास वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत. लहान गल्ल्यांमध्ये बेशिस्तपणे उभी केलेली वाहनेदेखील टोव्ह केली जाणार आहेत. याशिवाय, उच्च क्षमतेच्या क्रेनने रस्त्यावर बंद पडलेल्या बस व ट्रक बाजूला काढण्यात येतील. सर्वच वाहनांवरील कर्मचारी हे प्रशिक्षित व गणवेशधारी असणार आहेत.