लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागानेठाणे जिल्हयात अवैध दारु विक्रीविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहीमेमध्ये २८ आरोपींना अटक केली असून ११ वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ८७ हजार लीटर रसायनाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या पथकातील शिवशंकर पाटील, राजेंद्र शिरसाठ, रवींद्र उगले आणि विजय थोरात आदी निरीक्षकांनी १३ ते २८ आॅगस्ट दरम्यान ही मोहीम राबविली. जिल्हयातील पडले गाव,मानीवली गाव, बदलापूर,खुटंवली, मानेरागाव, किकडवाल, नेवाळी,अंबरनाथ, उंबार्डे,अंजुरगाव, आलीमघर, कारिवली, कालवार, केवणी, भिवंडी, दिवाखाडी,देसाईगाव आणि घोडबंदर रोड भागात या पथकांनी अवैध दारु निर्मितीचे अड्डे तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली. यात ५२ गुन्हे दाखल झाले असून २८ आरोपींना अटक झाली. मद्य निर्मितीसाठी लागणारे ८७ हजार २०० लीटर रसायन, एक हजार ६१३ लीटर गावठी दारु, २३६.५४ लीटर देशी दारु तर २०४ बल्क लीटर विदेशी मद्य, १५९.८७ बल्क लीटर बिअर आणि ११ वाहनांचा समावेश असून यापुढेही ही मोहीम अशाच प्रकारे राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक सांगडे यांनी सांगितले.
अवैध दारुविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: १५ दिवसांमध्ये २८ आरोपींना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: August 29, 2021 11:53 PM
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हयात अवैध दारु विक्रीविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहीमेमध्ये २८ आरोपींना अटक केली असून ११ वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुढेही ही मोहीम अशाच प्रकारे राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक निलेश सांगडे यांनी सांगितले.
ठळक मुद्दे११ वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्तठाणे जिल्हयात कारवाई