कल्याण : रोहित भोईर या तरूणाच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कर्णिक रोडवरील ‘होलीक्रॉस’ रूग्णालयाच्या केलेल्या तोडफोडीला राजकीय वळण लागले आहे. इस्पितळावर जमावाने हल्ला केल्याचे समजताच भाजपाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते डॉक्टरांच्या बचावाकरिता धावून आले तर भोईरच्या नातलगांची पाठराखण करण्याकरिता शिवसैनिकांनी धाव घेतली होती.या घटनेचे वृत्तांकन करताना जखमी झालेले पत्रकार केतन बेटावदकर यांच्या सशस्त्र हल्ला करणाºयांविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३२६ (गंभीर जखम करणे) नुसार गुन्हा दाखल करताना कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) हे कलम लावण्याचे खुबीने टाळले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या राजकीय संघर्षात पत्रकारावरील हल्ल्याची ही घटना बेदखल ठरण्याचे संकेत मिळत आहेत.कल्याण तालुक्यातील वरप गावात राहणाºया रोहित या तरु णाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रविवारी होलीक्रॉस या रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांसह १०० ते २०० जणांच्या जमावाने रूग्णालयात गोंधळ घातला. सामानाची तोडफोड केली. पत्रकार बेटावदकर यांच्यावर संतप्त जमावाने हल्ला चढवला. तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात बेटावदकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोळयाच्या वरच्या आणि खालच्या भागात, पायावर, पाठीवर आणि छातीवर वार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.आंदोलनकर्त्या जमावावर गुन्हे दाखलतोडफोड करणाºया जमावावर एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साधारण श्ांभरजणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असले तरी बेटावदकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याकरिता खुनाचा प्रयत्न या भादंविच्या ३०७ कलमाखाली गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे.पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे म्हणाले की, ३२६ कलमाखालील गुन्ह्याकरिताही ३०७ कलमाप्रमाणेच दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. चौकशीअंती गरज वाटल्यास ३०७ कलम लावले जाईल असे आश्वासन त्यांनी पत्रकारांना दिले. तरूणाचा मृत्यू, बेटावदकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला आणि रूग्णालयाची तोडफोड अशा तीन घटनांचा तपास स्वतंत्र अधिकाºयांमार्फत केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास केला जाईल कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, असे शिंदे म्हणाले. बेटावदकर आणि होलीक्रॉस रूग्णालयाचे संचालक मार्शन रॉड्रिक्स यांच्या तक्रारीवरून जमावाविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे या घटनेत पोलिसांवरही हल्ले झाले आहेत परंतू त्यांच्याकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रूग्णालय तोडफोडीला राजकीय रंग, सेना-भाजपा सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:37 AM