शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

राज्य शासनाने छाटले मुंबई महापालिकेचे पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:36 AM

शिवसेनेला विचारात न घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकरवी मुंबईचा २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंत्रालयात सादर केल्यानंतर, आता पालिकेत आणखी एक मोठा झटका दिला आहे.

- नारायण जाधव ठाणे : शिवसेनेला विचारात न घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकरवी मुंबईचा २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंत्रालयात सादर केल्यानंतर, आता पालिकेत आणखी एक मोठा झटका दिला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या ९६६.३० हेक्टर क्षेत्रावरील मुंबई महापालिकेचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. नव्या निर्णयानुसार मुंबईतील या एकमेव मोकळ्या जागेवरील नियोजनाचे अधिकार मुंबई ट्रस्टला बहाल केल्याचे खास सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.या संपूर्ण क्षेत्रासाठी नवा विकास आराखडा, नवी बांधकाम विकास नियमावली तयार करण्याचे आदेश मुंबई ट्रस्टला देण्यात आले आहेत. नगरविकास खात्याच्या निर्णयामुळे ट्रस्टच्या मोकळ्या जागेवर वेगवेगळे प्रकल्प राबविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुंबई महापालिकेसह सत्ताधारी शिवसेनेला मोठा झटका असल्याचे मानले जाते.>नितीन गडकरींचे स्वप्न पूर्णकरण्यासाठी खटाटोपमुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर समुद्राला समांतर मरिन ड्राइव्हच्या धर्तीवर रस्ता बांधून, त्याकडेला वॉटरफं्रट सिटी उभारण्याचा इरादा केंद्रीय रस्ते, नौकानयन व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. या ठिकाणी दुबईच्या १६३ मजल्यांच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच व प्रशस्त टॉवर बांधण्याचे संकेतही गडकरी यांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, या जागेच्या नियोजन प्राधिकरणाचे अधिकार मुंबई महापालिकेला असल्याने, सत्ताधारी शिवसेना नेहमीप्रमाणे यात आडकाठी आणेल, अशी साधार भीती असल्याने ते टाळण्यासाठीच केंद्राच्या निर्देशानुसार राज्याच्या नगरविकास खात्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई महापालिकेचे अशा प्रकारे पंख छाटून केंद्र आणि राज्य सरकारला या ९६६.९० हेक्टर क्षेत्राचा आपल्याला हवा तसा विकास आराखडा तयार करून घेणे सोपे झाले आहे.>मुंबईत या संस्थांकडेही आहेत नियोजन प्राधिकरणाचे अधिकारयापूर्वी बॅकबे रेक्लमेशन, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वडाळा ट्रक टर्मिनल, गोराई-मनोरी उत्तन पर्यटनस्थळ, ओशिवरा जिल्हा केंद्राचे अधिकार एमएमआरडीएला, धारावी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या नियोजनाचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आणि मरोळ, सीप्झ, अंधेरी येथील औद्योगिक क्षेत्राचे अधिकार एमआयडीसीला देऊन मुंबई महापालिकेचे पंख छाटण्यात आले आहेत. या संपूर्ण प्राधिकरणांचे क्षेत्र मुंबईच्या एकूण ४५,८२९ हेक्टरपैकी ४,३२३ हेक्टर आहे. टक्केवारीत ते ९.४३ टक्के इतके आहे. त्यात आता आणखी पोर्ट ट्रस्टच्या ९६६.३० हेक्टर क्षेत्राची भर पडणार आहे.>परवडणारी घरे बांधण्याचा होता इरादा...मुंबई महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेसह मिठागरे आणि इतर काही जागांचा ओपन स्पेस म्हणून समावेश करण्यात आला आहे. या जागेपैकी १४० हेक्टर क्षेत्रांवर बिल्डरांना हाताशी धरून, परवडणारी घरे आणि इतर सुविधा देण्याचा महापलिकेचा इरादा होता, परंतु आता या सर्वांवर पाणी फिरले आहे.कारण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचे असलेले ९३०.९० हेक्टर आणि मालकीचे नसलेले ३५.४० अशा ९६६.३० हेक्टर जमिनीच्या वापराबाबतचे अधिकार अधिसूचनेद्वारे त्यांना देण्यात आले आहेत. याबाबत हरकती-सूचनांसाठी २३ मे ही शेवटची तारीख आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका