शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील उद्यानाची दुरावस्था; मृत जनावरांच्या अवशेषाने परिसरात दुर्गंधी, नागरिक हैराण 

By रणजीत इंगळे | Published: September 12, 2022 2:14 PM

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पाचपाखडी येथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पाचपाखडी येथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे.  हे उद्यान महापालिका मुख्यालयापासून आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. या  उद्यानाची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचरा साठलेला आहे, उद्यानातील जॉगिंग ट्रॅकचा काही भाग उखडलेला, उद्यानात एका ठिकाणी पडलेला काचांचा खच, कचरा टाकण्यासाठी लावलेले डबे या ठिकाणी गायब आहेत. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच,सुरक्षा रक्षकांचा अभाव, ना झाडांची देखभाल,ना छाटणी ना हिरवळ ना स्वच्छता त्यामुळे गार्डन भकास ओसाड दिसत असल्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

मागील चार दिवसापासून या उद्यानात जॉगिंग ट्रॅकच्या लगत एक कुत्रा मरून पडलेला आहे त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरलेली असून देखील अद्याप पर्यंत कोणीही उचलण्यास किंवा विल्हेवाट लावण्यास आलेले नाही. 

ठाणेकरांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ठाणे पोलिसांनी पुढाकार घेत मॉर्निंग वॉक साठी सकाळी पाच ते सात या वेळेत ठाणे शहरातील तीनात नाका उपायुक्त कार्यालय ते धर्मवीर नाका सर्विस रोड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी होत असते. परंतु या सेवा रस्त्यालगत असलेल्या हुंडाई शोरूम ते सेल पंप समोरील उद्यानाची दुरावस्था झालेली आहे.

तरी कृपया वरील सर्व गोष्टींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता बारा बंगला व ज्याप्रमाणे पूर्व द्रुतगती मार्गावरील ज्ञानसाधना कॉलेज ते तीन हात  सेवा रस्ता लगत उद्यान, येथे सुशोभीकरण करण्यात येत आहे त्या धर्तीवर तातडीने पाचपाखाडी,नौपाडा येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात यावे जेणेकरून मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे नगरीचे सौंदर्यात भर पडेल.अन्यथा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा काँग्रेसचे पदाधीकारी राहुल पिंगळे यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणे