ठाणे : आश्रमशाळांची वेळ पूर्ववत म्हणजे सकाळी ११ ते संध्याकाळी ५वाजेची करणे या मागणीसह शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, आदिवासी विकास विभागाचा नवीन आकृतीबंध रद्द करून रद्द झालेली पदे पुनर्जीवित करणे आदी मागण्यांसाठी आश्रमशाळांचे शिक्षक व कर्मचाºयांकडून २३ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
आश्रमशाळा शिक्षक व अन्य सर्व कर्मचाºयांचे ही राज्यव्यापी धडक आंदोलन थेट मंत्रालयावर होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानावर छेडण्यात येणाºया या आंदोलनाचे नेतृत्व सिटू प्रणित, आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांच्यासह प्रा. बी.टी.भामरे, डॉ. ड.एल. कराड,रामदास खवशी, एस. जे. शेवाळे, राजेश पाटील,डॉ. अशोक झुंझारे, अमोल वाबळे आदी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन पार पडणार आहे. त्याव्दारे शाळेचे वेळापत्रक पूर्ववत ठेवण्याच्या प्रमुख मागणीसह पदे पुनर्जीवित करणे, या शाळेच्या मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देणे, रिक्त पदांची भरती करणे, रोजंदारी कर्मचारी, कंत्राटी शिक्षकांना,कौशल्य विकास प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, शासकीय आश्रमशाळांप्रमाणे अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना कायम करणे, खाते नोंदणी क्रमांक मिळून अंशदान रकमेचा हिशोब मिळणे, अधीक्षक व अधिक्षिकांना सहाय्यक पदे निर्माण करून शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करणे, ‘काम नाही, वेतन नाही’ हे अन्यायकारक धोरण रद्द करणे आदींसाठी आंदोलनाचा पवित्रा या शिक्षक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.