शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

ठाण्यातील शिवसेना नगरसेवकाची पत्नीला मारहाण: जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 9:49 PM

नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार देणा-या त्यांच्या पत्नीलाच कळवा पोसिलांनी आधारकार्डसह इतर पुरावे मागितल्याचा आरोप आहे. दरम्यान, कांबळे यांच्यावर तडीपारीचाही प्रस्ताव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपतीविरुद्ध पोलिसात केली तक्रारमध्यस्थी करणा-या आईलाही केली मारहाणतक्रार नोंदवितांना पोलिसांनी केली आधारकार्डची मागणी

ठाणे : शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे या पतीने आपल्या गळ्यावर सुरी ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केस ओढून भिंतीवर डोकेही आपटले. मिळेल त्या काचेच्या भांड्यानेही डोक्यात प्रहार केला. अमानुषपणे मारहाण होत असताना मध्यस्थी करणा-या स्वत:च्या आईलाही त्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कॅरलीन कांबळे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.कॅरलीन यांनी या संदर्भात कळवा पोलिसांकडेही २८ जानेवारी २०१८ रोजी तक्रार दाखल केली. कॅरलीन यांना पहिल्या पतीपासून सनी (१५) आणि जिशॅन (१५) ही दोन तसेच एक दत्तक मुलगा होता आणि गणेश यांच्याशी प्रेमविवाह झाल्यानंतर दोन अशी पाच मुले आहेत. गणेश यांना त्यांचे वडील मल्लिकार्जून यांनी त्यांच्या दुसºया पत्नीमुळे गणेशसह त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढले होते. त्यावेळी गणेश यांना कॅरलीन यांनी भावनिक आणि आर्थिक आधार दिला. ९ जून २०१३ रोजी गणेश यांच्याबरोबर मंदिरामध्ये विवाह केला. दरम्यान, एका मारहाण प्रकरणात गणेश यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लागला. यात गणेश आणि त्यांच्या वडिलांनाही अटक झाली होती. या प्रकरणात जामीनासाठीही पत्नी या नात्याने मदत केल्यामुळे सहा महिन्यातच त्यांची जामीनावर सुटकाही झाली. कॅरलीन गरोदर असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीनही लवकर मिळाला होता. हे सर्व असताना नशेच्या आहारी गेलेल्या गणेश यांनी त्यांना अनेकदा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून डोकेही आपटले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही दिली, असे कॅरलीनने तक्रारीत म्हटले आहे.आधी पत्नी म्हणून नाकारणा-या गणेश यांनी नंतर पोलीस ठाण्यातच माफीही मागितली होती; परंतु, २६ जानेवारी रोजीही त्यांनी मारहाण केल्यामुळे याबाबतची तक्रार २८ जानेवारी रोजी कळवा पोलीस ठाण्यात केली. त्यावेळी मात्र पोलिसांनी आधार कार्ड तसेच लग्नाचा पुरावाही मागितल्याचा आरोप कॅटलीन यांनी केला. हुंडा घेण्यासाठी त्यांनी दुस-याही लग्नाचा घाट घातला. त्यामुळेच सतत अगदी लहान मुलांसमोरही मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. स्वत: पदरमोड करून गणेश यांच्यासह त्यांच्या भावाला आणि वडिलांचीही जामीनावर सुटका करण्यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु, त्याच पतीकडून नगरसेवक असल्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास दिला जातोय, त्यांच्यावर कारवाई करून न्याय मिळावा, अशी कैफियत त्यांनी मांडली आहे.....................

या संदर्भात नगरसेवक कांबळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांचा फोन नॉट रिचेबल येत असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.---------------‘गणेश यांच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीसारखे गुन्हे दाखल आहेत. कॅरलीन यांच्याही तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध तडीपारीचाही प्रस्ताव ठेवलेला आहे. ४९८ ची तक्रार दाखल करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. म्हणून कॅरलीन यांच्याकडे लग्नपत्रिकेसह कागदपत्रे मागितली होती. ’-शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा