शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

भारतीय सैन्य एकतेचे मूर्तिमंत उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 12:35 AM

विलास सुतावणे यांचे मत : आतापर्यंत २१ बहादुरांना परमवीरचक्र सन्मान

ठाणे : भारतीय सैन्य हे या देशातील विविधतेतील एकता या ब्रीदवाक्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. धर्म, जात, पंथ, भाषा यापलीकडे जाऊन देशाचे ऐक्य आणि अखंडता यासाठी सशक्त सेना नेहमीच तत्पर असते. त्यांच्यासाठी भारतीय हा एकच धर्म असतो, अशा भावना सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांना सतत भेटून त्यांचा उत्साह वाढविणारे विलास सुतावणे यांनी व्यक्त केल्या.

अत्रे कट्ट्यावर बुधवारी ‘जरा याद करो कुर्बानी आणि परमवीरचक्र’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुतावणे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, आपल्या सैन्यदलातील प्रत्येक जण स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशावर आलेल्या परकीय आक्रमणाला धीराने सामोरे जात असतो. माणसाच्या काही भावना नैसर्गिक असतात. जसे की, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रप्रेम हे उपजत असते. यातील राष्ट्रप्रेमाचे नाते परमवीरचक्र या पुरस्कारासाठी जोडलेले असते, असे मत त्यांनी मांडले. २४ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. भारत हा संस्थापक सदस्य होता. जागतिक शांतता हे या संयुक्त राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. भारतीय वायुदल आणि सैन्यदल यांचे श्रीलंकेतील तमिळ बंडखोर शोधायची मोहीम म्हणजे आॅपरेशन पवन आणि त्यात नेमके आठ महत रेजिमेंटचे रामस्वामी परमेश्वरन शहीद झाले आणि त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देण्यात आले. कारगिल युद्धात मनोज कुमार पांड्ये आणि विक्रम बात्रा या दोघांना मरणोत्तर परमवीरचक्र मिळाले, तर ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव आणि रायफलमॅन संजय कुमार यांना हा पुरस्कार जिवंत असताना मिळाला. १९६२ च्या चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला. तरीसुद्धा भारतीय सैन्याने खचून न जाता असामान्य शौर्य दाखविले. मेजर धनसिंग थापा, सुभेदार योगिंदर सिंग आणि मेजर शैतानसिंग यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले. देशाला समृद्ध करण्यासाठी अहोरात्र परिश्रम आणि पराक्रम गाजविणाऱ्या प्रत्येक सैनिकासाठी नव्हे तर सर्व भारतीय नागरिकांसाठी असे हे २१ परमवीरचक्रविजेते नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असे सुतावणे यावेळी म्हणाले.परमवीरचक्र हे युद्धातील शौर्याबद्दल देण्यात येणारे भारतातील सर्वोच्च पारितोषिक आहे. भारतरत्न पुरस्काराच्या खालोखाल दुसºया क्रमांकाचे हे मानचिन्ह आहे. १९९९ सालातील कारगिल युद्ध प्रसिद्धिमाध्यमांमुळे सर्वांच्या स्मरणात आहे. या युद्धात चार शूरवीरांना परमवीरचक्र मिळाल्याची माहिती विलास सुतावणे यांनी दिली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानthaneठाणे