शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

स्टाइल में रहने का...; ठाण्यातील नेत्यांची कॉटनला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:35 PM

रंगीबेरंगी कपडे परिधान करण्याचा ट्रेण्ड

- अजित मांडके ठाणे : नरेंद्र मोदी यांनी विकास किती केला, याबाबत मतभिन्नता असू शकते. मात्र, मोदींनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महागडे, रंगीबेरंगी कुर्ते, जॅकेट परिधान करून देशभरातील नेत्यांना ‘स्टाइल में रहने का’, ही शिकवण दिली. ठाण्यातील नेत्यांनी मोदीच नव्हे, तर त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडूनही ड्रेससेन्स परफेक्ट पकडला आहे.आता मागील काही वर्षांत मीडिया व सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आपण प्रेझेंटेबल असले पाहिजे, याची जाणीव झाल्याने राजकीय मंडळींचा पोशाख बदलला असून रंगीत ब्रॅण्डेड कपड्यांवर नेते अधिक भर देऊ लागले आहेत. पांढरे पोशाख अडगळीत जाऊन नवनवीन उठावदार कपडे राजकीय मंडळींच्या अंगावर दिसू लागले आहेत.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे पांढरा लिननचा शर्ट, पांढरी पॅण्ट अशा पोशाखात असतात. मात्र, त्यांच्या पक्षातील आमदार प्रताप सरनाईक हे आपल्या महागड्या व आकर्षक पेहरावाकरिता ओळखले जातात. सरनाईक पांढरे कपडे परिधान करणे टाळतात. मोदी जॅकेट त्यांनीही आपलेसे केले असून त्यांच्याकडील एकाहून एक सरस हटके जॅकेट ही त्यांची ओळख आहे. सरनाईक व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात अनेक बाबतीत स्पर्धा सुरू असते.मात्र, कपड्यांच्या पसंतीच्या बाबतीतही हे दोघे स्पर्धा करतात. रेडिमेड कपड्यांचीही त्यांना आवड आहे. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा पोशाख तसा साधाच आहे. शर्ट-पॅण्ट आणि त्यावर कधीतरी जॅकेट असा त्यांचा पेहराव असतो. ठाण्यातील स्टोअरमधून ते कपडे शिऊन घेतात.सरनाईक यांच्या कुठल्याही पोशाखाची किंमत १५ ते २५ हजारांच्या पुढेच असते. ठाणे तसेच मुंबईतील काही खास डिझायनरकडून ते कपडेशिवून घेतात.राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे रंगीबेरंगी कपडे घालत असून ठाण्यातील रिच मॅन टेलरकडून तसेच भायखळ्यातील एका प्रतिथयश टेलरकडून ते कपडे शिवून घेतात. त्यांच्याही एका पोशाखाची किंमत १० हजारांपेक्षा जास्त असते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणे