शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

...तरीही ‘रेमडेसिविर’ बाहेरून आणण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:44 AM

समितीच्या सूचनेनुसार, महापालिकेने एक फॉर्म तयार केला असून, ताे आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना दिला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जिल्हा नियंत्रण समिती स्थापन केली आहे. तसेच, रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगू नये, असे निर्देश दिलेले असतानाही खासगी रुग्णालयातील डाॅक्टर हे इंजेक्शन बाहेरून आणण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनबाबत कल्याण-डाेंबिवलीत अतिरेक सुरू असून, त्याबाबत रुग्णांचे नातेवाईक उघडपणे बाेलण्यास घाबरत आहेत.

समितीच्या सूचनेनुसार, महापालिकेने एक फॉर्म तयार केला असून, ताे आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना दिला जातो. या फॉर्ममध्ये रुग्णाला कधी दाखल केले, उपचार कधीपासून सुरू केले, त्याचे नाव-पत्ता, त्याची ऑक्सिजनची पातळी, रक्तचाचण्या, त्याचा स्कॅन रिपोर्ट, रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यकता, याबाबत तपशील भरून द्यायचा आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत हा तपशील महापालिकेस मिळाल्यानंतर ताे आरोग्य विभागाकडून समितीकडे पाठविला जाईल. रात्री दहा वाजेपर्यंत हा अहवाल समितीकडे पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार कोणत्या पुरवठादाराकडून रेमडेसिविर इंजेक्शन मिळेल, याची हमी दिली जाईल. इतके सगळे असताना खासगी डॉक्टरांकडून थेट रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणा असे सांगितले जात आहेत.

१२ हजार इंजेक्शनची केली आहे मागणीमहापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यासंदर्भात म्हणाल्या की, खासगी रुग्णालयात आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा अहवाल जिल्हा नियंत्रण समितीला पाठविला जात आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात आजच्या दिवसापुरतेच रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस उपलब्ध आहेत. महापालिकेने आणखी १२ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मागविले आहेत. मागणी केलेले इंजेक्शन २० एप्रिलपर्यंत मिळणे अपेक्षित आहेत.