शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

एसटीला सहा महिन्यांत साडेसहा कोटींचा तोटा

By admin | Published: November 08, 2016 2:17 AM

जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर आणि वाडा या तालुक्यांमध्ये जीप व अन्य वाहनांद्वारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या

ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर आणि वाडा या तालुक्यांमध्ये जीप व अन्य वाहनांद्वारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)ला ठाणे विभागात मागील सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक सहा कोटी ५३ लाख ६७ हजार रूपयांचा तोटा झाल्याचे एसटीचे ठाणे विभाग नियंत्रक अविनाश पाटील यांनी सांगितले. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे मुरबाड, शहापूर, वाडा येथील तिन्ही बसडेपो तोट्यात आहेत. मनमानी व बिनधास्त सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यास आरटीओ व स्थानिक पोलीस यंत्रणा कमी पडल्याचे उघड झाले आहे. याचा फटका ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसेसला बसला असून त्या सध्या तोट्यात आहेत. या तिन्ही बसडेपोच्या परिसरात प्रत्येकी सुमारे ३०० खाजगी जीप, रिक्षा टेम्पोमधून प्रवासी वाहतूक करीत आहेत. रोज प्रत्येक तालुका बस डेपोच्या परिसरातून सुमारे दहा ते १५ हजार प्रवाशांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा अंदाज व्यक्त करून त्यांचा आर्थिक फटका एसटीला बसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या या सहा कोटी ५३ लाख रूपये तोट्यात शहापूर बसडेपोचे दोन कोटी ७६ लाख रुपये, मुरबाड डेपोचे एक कोटी ९३ लाख ६७ हजार आणि वाडा बस डेपोचे एक कोटी ८४ लाख रुपये यांचा समावेश आहे. ऐन दिवाळीत तर खाजगी ट्रॅव्हल्सच्या नव्या कोऱ्या ५०० बसेस विनापरवाना रस्त्यावर धावल्याचा अंदाज एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सुट्टीच्या कालावधीत देखील खासगी बसेसमुळे एसटीला दिवसाकाठी सुमारे ५० हजारांचा फटका बसत आहे. वंदना टॉकीज, जांभळी नाका, रबाळे, खोपट तसेच मुलुंड चेकनाका येथून खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस बिनधास्त प्रवासी घेतात व त्याचा फटका ठाण्यातील एसटीला बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)