लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु आता सलग दोन दिवस आलेल्या साठय़ामुळे आणि आधीचा काही प्रमाणात शिल्लक असलेल्या साठय़ामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सध्या १ लाख ८० हजार ५८२ लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे तुर्तास तरी लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु राहणार असल्याचे दिसत आहे. यामध्ये, १ लाख ५४ हजार ७३२ कोव्हीशिल्ड आणि २५ हजार ८५० कोव्हॅक्सीनचा साठा शिल्लक आहे परंतु हा साठा पुढील किती दिवस चालणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.
ठाण्यासह जिल्ह्यात मागील काही दिवसापासून लसींचा साठा अपुरा पडत होता. त्यामुळे अनेक केंद्रावरील लसीकरण बंद करण्यात आले होते. ठाणो महापालिका हद्दीत विकेंड लॉकडाऊनचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरळीत लसीकरण सुरु झाले आहे. भिवंडीत कोव्हीशिल्डचे ८४५० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सीनचे ३ हजार आणि कोव्हीशिल्डचे १४ हजार ८७० डोस शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सीनचे ६ हजार ५५० डोस असून कोव्हीशिल्डचा १७ हजार ४९० डोस उपलब्ध झाले आहेत. तर मिरा भाईंदरमध्ये कोव्हॅक्सीनचे २ हजार ३३० डोस शिल्लक आहेत, तर कोव्हीशिल्डचे १८ हजार २३० डोस शिल्लक आहेत.
नवीमुंबईतही कोव्हॅक्सीनचे ८ हजार २८० डोस शिल्लक असून कोव्हीशिल्डचे १८ हजार ४३० डोस शिल्लक आहेत. तर उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सीनचे ३५० आणि कोव्हीशिल्डचे ३ हजार ७२० डोस शिल्लक आहेत. तर ठाणे जिल्हा ग्रामीण भागासाठी कोव्हॅक्सीनचे ५ हजार ३४० तर कोव्हीशिल्डचे ३३ हजार ४१० डोस शिल्लक आहेत. जिल्ह्याला आलेला साठा पुरेसा नसला तरी सध्या लसीकरण मोहीम पुन्हा एकदा वेगाने सुरु झाली आहे. परंतु पुढील काही दिवसात आणखी लसींचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.